मुंबई : वांद्र्यात आग लागेलल्या एमटीएनएलच्या इमारतीमधून जवळपास सर्व कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती, स्थानिक आमदार आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. १०० जणांना आगीच्या कचाट्यातून वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
एमटीएनएल इमारतीला सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला भीषण आग लागली. या इमारतीच्या गच्चीवर सुमारे १०० जण अडकले होते. आग एवढी भीषण होती की परिसरात सगळीकडे काळ्या धुराचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बचावकार्यात अडकलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची सुटका केली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat