विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

    21-Jul-2019
Total Views | 174



मुंबई : ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यासाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी ऐवजी रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. बड्या खेळाडूंच्या विश्रांतीमुळे बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये २ कसोटी, ३ एकदिवसीय सामने तसेच ३ टी-२० सामानाने खेळवण्यात येणार आहेत.

 

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी विराट कोहलीसोबत भारतीय संघाची घोषणा केली. महेंद्रसिंह धोनीने या दौऱ्यातून माघार घेतली आहे. तर जसप्रीत बुमराहला या दौऱ्यात विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांना संघातून वगळण्यात आले आहे. विश्वचषकादरम्यान दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या शिखर धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कसोटी संघामध्ये यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने देखील पुनरागमन केले आहे.

 

भारतीय एकदिवसीय संघ

 

विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा (उपकप्तान) , शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खालील अहमद, नवदीप सैनी

 

भारतीय कसोटी संघ

 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, उमेश यादव

 

भारतीय टी-२० संघ

 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), कृणाल पंड्या, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121