नवी दिल्ली : घाऊक महागाईचा दर जूनमध्ये २.०२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. हा दर गेल्या २३ महिन्यांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी जुलैमध्ये १.८८ टक्के इतका दर नोंदवण्यात आला होता. भाजीपाल्याच्या दरांतील घट, इंधन आणि विजेच्या किमतीत घट झाल्याने घाऊक महागाई दर घटला आहे. मे महिन्यात हा दर २.४५ टक्के इतका होता. केंद्रीय सांख्यिकीय विभागाने सोमवारी ही माहिती जाहीर केली.
एप्रिलमध्ये घाऊक महागाई दराचा आकडा ३.२४ टक्के इतका होता. सांख्यिकीय विभागाने गेल्या आठवड्यात किरकोळ महागाई दर जाहीर केला होता. त्यात खाद्यपदार्थ आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने जूनमध्ये तो ३.१८ टक्क्यांवर पोहोचला होता. हा दर गेल्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता.
श्रेणी | मे महिन्यातील महागाई दर | जूनमधील महागाई दर |
खाद्यपदार्थ | ६.९९% | ६.९८% |
भाजीपाला | ३३.१५% | २४.७६% |
बटाटा | -२३.३६% | -२४.२७% |
कांदा | १५.८९% | १६.६३% |
इंधन-वीज | ०.९८% | -२.२०% |
उत्पादी तवस्तू
| ०.९४% | ०.९४% |
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat