नवी दिल्ली : १ जुलैपासून दैनंदिन व्यवहारांत अनेक बदल होणार आहेत. त्यातील काही बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारने विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी १ जूलै ही तारीख निश्चित केल्याने सोमवारपासून हे बदल होणार आहेत.
रेल्वे गाड्यांच्या नावासह वेळापत्रकात बदल
रेल्वे मंत्रालयाने गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही ठिकाणी नव्याने थांबे देण्याचा विचार रेल्वेतर्फे करण्यात आला आहे. अशा एकूण १८ गाड्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेतही बदल करण्यात येणार आहे.
बॅंकींग क्षेत्रातील बदल
एनईएफटी, आरटीजीएस आदी बॅंकींग व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्क १ जुलैपासून बंद होणार आहेत. यामुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांनी दिलासा मिळणार आहे. एसबीआयने आपल्या गृह कर्जवारील व्याज दर रेपो रेटशी जोडणार आहे. यामुळे रेपो रेटच्या बदलानुसार गृह कर्जाच्या व्याजात वाढ किंवा घट होणार आहे.
बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये बदल
सुकन्या समृद्धि, पीपीएफ आदींसारख्या लहान बचत योजनांवरील व्याजदरांत ०.१ टक्क्याची कपात करण्यात येणार आहे. १ जुलैपासून पुढील तीन महिन्यांपर्यंत हे व्याजदर कायम राहणार आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat