मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यात सावरणे गावामध्ये बुधवारी पहाटे बिबट्याचे ६ ते ८ महिन्याचे मादी पिल्लू मृत्यावस्थेत आढळले. स्थानिक वन विभागाचे कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून आईविना वावरणाऱ्या या पिल्लावर नजर ठेवून होते. त्यांनी या पिल्लाला वाचविण्यासाठी अथक प्रय़त्न केले. मात्र, बुधवारी काळू नदीच्या पात्रामधील एका कपारीत हे पिल्लू मृतावस्थेत आढळले. शरीरामध्ये निर्माण झालेली पाण्याची कमतरता आणि दिर्घकालीन भुकेमुळे या पिल्लाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मात्र दोन दिवसांमध्ये पिल्लाने एकदाही दिलेल्या खाद्याला हात न लावल्याचे मांजरे यांनी सांगितले. त्याची हालचाल टिपण्यासाठी या ठिकाणी 'कॅमेरा ट्रॅप' लावण्यात आले होते. त्यामध्ये त्याचा वावर टिपला जाता होता. त्यानुसार हे पिल्लू शाररिक दृष्ट्या सुदृढ वाटत होते. मात्र दोन दिवस त्याने काही न खाल्याने आणि आईचाही आसपास ठावठिकाणा नसल्याने त्याला जेरबंद करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. यासाठी सर्व तयारी पूर्ण करुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बिबट्या बचाव पथकाला बुधवारी सकाळी पाचारण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे ६.३० वाजता परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कपारीजवळ गेलेल्या वनसरक्षकाला हे पिल्लू मृतावस्थेत आढळले. या ठिकाणी दाखल झालेल्या बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी पिल्लाचे मृत शरीर शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. त्याची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून करण्यात आली. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने आणि दिर्घकाळ उपाशी राहिल्याने या पिल्लाचा मृत्यू झाल्याची शक्यता राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यक अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांनी वर्तवली आहे.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat