चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान

    27-May-2019
Total Views | 141



 

 

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार रविवारी रात्री प्रदान करण्यात आले. ५६ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि सुप्रसिद्ध अभिनेता भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना प्रदान करण्यात आला.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पुरस्काराची घोषणा केली होती. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 

जागतिक सिनेमाचे म्युझियममध्ये दादासाहेब फाळकेंचा पुतळा

 

पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

 

राज्य मराठी चित्रपट सोहळ्यात आज देण्यात आलेले पुरस्कार

 

५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यामध्ये यंदा उत्कृष्ट चित्रपट भोंगा ठरला. तर उत्कृष्ट अभिनेता के. के. मेनन व उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांनी पुरस्कार पट‍काविला.

 

सर्वोत्कृष्ट कथा - सुधाकर रेड्डी (नाळ)

 

सर्वोत्कृष्ट पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे (भोंगा )

 

सर्वोत्कृष्ट संवाद - विवेक बेळे (आपला माणूस)

 

सर्वोत्कृष्ट गीत - संजय पाटील (बंदिशाळा)

 

सर्वोत्कृष्ट संगीत - राजेश सरकाटे (मेनका उर्वशी)

 

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)

 

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानाडे (व्हॉटअप लग्न)

 

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका -प्रियंका बर्वे (बंदिशाळा)

 

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक -उमेश जाधव (मेनका उर्वशी)

 

सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन (एक संगायचाय अन्सेड हॉर्मनी)

 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मुक्ता बर्वे (बंदीशाला)

 

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)

 

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - छाया क़दम (न्यूड)

 

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख (तेंडल्या)

 

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री-गौरी कोठवदे (पुष्पक विमान)

 

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिति- शांताई मोशन पिक्चर्स (बंदीशाला)

 

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन -सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर (तेंडल्या)

 
सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121