मोदी लाटेचा अंदाज बांधत संभाव्य निकालांवर तावातावाने आपली मते मांडणारेही ज्या लोकसभा मतदार संघाविषयी ठामपणे आपली मते मांडण्यास टाळत होते, तो होता खासदार पूनम महाजन यांचा उत्तर-मध्य मुंबई. त्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी असलेली अल्पसंख्याक मते. साधारणत: ४-५ लाख एकगठ्ठा पडणारी मते हा या मतदार संघातला निर्णायक घटक. पण या घटकावर मात केली विलेपार्ले विधानसभा मतदार संघाने. पार्लेकरांनी आपल्या लाडक्या खासदारासाठी विक्रमी मतदान केले. कधी नव्हे एवढा पुढाकार इथल्या मतदारांनी घेतला आणि पूनम महाजन विजयाच्या दिशेने निघून गेल्या. युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद व त्यासाठी करावा लागणारा देशभर प्रवास अशी तारेवरची कसरत साधून पूनम महाजन यांनी या मतदार संघात मिळविलेला विजय वेगळा मानावा लागतो तो यासाठी. मोदीलाटेव्यतिरिक्त इथल्या काही मूलभूत समस्या सोडविण्यासाठी खा. महाजन यांनी पुढाकार घेतला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat