मुंबई : प्रतिष्ठेचा ७२ वा कान चित्रपट महोत्सवात मोठ्या दिमाखात सुरु आहे. या मोहत्सवात भारतीय तरुणाने आपली छाप सोडली आहे. अच्युतानंद द्विवेदी असे या तरुणाचे नाव असून त्याच्या ‘सीड मदर’ या लघुपटाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. द्विवेदी यांच्या ‘सीड मदर’ या लघुपटाला ‘नेप्रेसो टँलेंटस २०१९’ या विभागात तिसर्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
.@FilmCompanion congratulates Indian filmmaker Achyutanand Dwivedi for winning the #NespressoTalent2019 @Festival_Cannes for short film ‘Seed Mother’. Log on to https://t.co/fAv5KhLWIw for more on #Cannes2019 #FCAtCannes pic.twitter.com/pzZ9iKIHbr
— Film Companion Studios (@FilmCompanion) May 18, 2019
‘सीड मदर’ हा त्याचा तीन मिनिटांचा लघुपट असून अहमदनगर जिह्यातील बीजमाता म्हणून ओळखल्या जाणार्या राहिबाई सोमा पोपरे यांची कहाणी या लघुपटात मांडली आहे. कान महोत्सवात नेप्रेसो टँलेंटस या गटासाठी यावर्षी 'वुई आर व्हॉट वुई इट' हा विषय देण्यात आला होता. या विषयासंबंधित ४७ देशांमधून ३७१ प्रवेशिका आल्या होत्या. यातून द्विवेदी यांच्या ‘सीड मदर’ला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ९/१६ व्हिडिओ फॉरमॅटमधील लघुपटांना या पुरस्कारासाठी प्राधान्य दिले जाते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat