नवी दिल्ली : देशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू काश्मीर येथे एकूण ७२ जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी १२ कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुपारपर्यंत देशात सरासरी टक्के मतदान झाले. महाराष्ट्रमध्ये २९.१८ टक्के, राजस्थानमध्ये ४४.५१ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ३४.१९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ५२.३७ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ४३.३८ टक्के, ओडिशामध्ये ३५.७९ टक्के, झारखंडमध्ये ४४.९० टक्के, बिहारमध्ये ३७.७१ टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये ६.६६ टक्के मतदान झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन
चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत तरुणांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत तुमचे मत लोकशाही बळकट करेल त्यामुळे मतदान करा असे आवाहन केले. यासोबतच सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ओडिशातील पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूशिल्प साकारत मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बाजवला पहिजे असे सांगत मतदानाचे आवाहन केले.
पश्चिम बंगालमध्ये दगडफेक
आसनसोल येथे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्या कारवर दगाफरक करण्यात आल्याची घटना घडली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. या दगडफेकीत सुप्रियो यांच्या कारचे नुकसान झाले असून पोलिसांच्या मध्यस्तीनंतर सुप्रियो यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. आसनसोलमधील एका मतदान केंद्रावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्यानंतर नागरिकांच्या समजुतीची सुप्रियो त्याठिकाणी गेले असता तृणमूल काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सुप्रियो यांच्या गाडीवर दगफेक केली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat