काँग्रेसला रामराम करत एस. कृष्ण कुमार यांचा भाजप प्रवेश

    20-Apr-2019
Total Views | 201



नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. केरळमधील कोल्लमचे खासदार एस. कृष्ण कुमार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कृष्ण कुमार हे कोल्लमचे तीन वेळेस खासदार राहिले आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात कृष्ण कुमार यांनी माजी केंद्रीय मंत्री शहनवाज हुसैन आणि प्रवक्ते अनिल बलूनी यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला. माझे उरलेले जीवन पंतप्रधान मोदींचे हात आणखीन मजबुज करण्यासाठी खर्च करणार असल्याचे कृष्ण कुमार यांनी भाजप प्रवेशानंतर सांगितले.

 

देशाचा विकास घडवायचा असेल तर पंतप्रधान मोदींना पुढील पाच वर्षच नाहीतर आणखीन दहा वर्ष सत्ता दिली पाहिजे. ते देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील, असेही कृष्ण कुमार म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121