पाकिस्तानच्या सात चौक्या उध्वस्त; भारतीय सैन्यांची कारवाई

    02-Apr-2019
Total Views |




जम्मू-काश्मीर : भारतीय सैन्यांने पाकिस्तान सैन्यांवर धडक कारवाई करत त्यांच्या सात चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्यांनी ही कारवाई केली. यात पाकिस्तानच्या चौक्यासोबतच पाकिस्तान लष्कराचे अनेक सैनिक मारले गेल्याची माहिती सुरक्षादलाने दिली आहे.

 

पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ, राजौरी व शहापूर सेक्टरमधील नागरीवस्त्यांवर सोमवारपासून गोळीबार व तोफांचा मारा सुरु होता. यात दोन जण ठार व एका जवानाला वीरमरण आले होते. तर जवळपास २४ जण या गोळीबारात जखमी झाले होते. यानंतर भारतीय सैन्यांनी जोरदार कारवाई करत पाकिस्तानच्या सात चौक्या उध्वस्त केल्या आहेत.

 

रखचिक्री आणि रावलकोटे सेक्टरमधील सात चौक्या भारतीय सैन्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. यात पाकिस्तानने आपले तीन सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून होणाऱ्या जोरदार गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुंछ भागातील अनेक शाळा, महाविद्यालयं काही काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121