बिहारमध्ये २ संशयित दहशतवादी अटकेत

    25-Mar-2019
Total Views | 35



पाटना : पाटनामध्ये बिहार एटीएसने मोठी कारवाई केली असून २ बांग्लादेशींनी अटक केली आहे. या दोघांकडून काही कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली असून त्या आधारे आता तपास सुरू आहे. दोघेही जमीयत-उल-मुजाहिद्दीन आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेश या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. खैरुल मंडल आणि अबु सुल्तान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून सैन्याबद्दलची काही माहिती देखील हाती लागली आहे. शिवाय, आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही कागदपत्रेदेखील ताब्यात घेण्यात आली आहेत. त्या आधारे सध्या चौकशी सुरू आहे.

 

दिल्ली, मुंबई आणि गोवामध्ये हाय अलर्ट

 

दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि गोव्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा आयसिस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121