नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील ४७ जणांना पद्म पुरास्काराने सन्मानित केले. त्यात ९ खेळाडूंचा समावेश आहे. १९८४ साली माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बछेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
पद्मश्री पुरस्कारांमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया, फुटबॉलपटू सुनील छेत्री, क्रिकेटर गौमत गंभीर, बॉस्केटबॉलपटू प्रशिस्त सिंह, बुद्धीबळपटू हरिका द्रोणावल्ली, कबड्डीपटू अजय ठाकूर, तीरंदाज बॉमबायला देवी लॅशराम आणि टेबल टेनिसपटू अचंत शरत कमल यांना गौरविण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एक विशेष कार्यक्रमात या प्रतिष्ठित व्यक्तिचा पद्म पुरस्कार देऊन सम्मानित केले. यंदाच्या वर्षी १२२ जणांना पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्याची घोषणा २६ जानेवारील प्रजासत्ताक दिनी केली होती. यापूर्वी ११ मार्च रोजी राष्ट्रपतींनी १ पद्म विभूषण, ८ पद्म आणि ४६ पद्मश्री पुरस्कार दिले गेले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat