नवी दिल्ली : हवाई प्रवास करायची तुमची इच्छा असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. स्पाईसजेट या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्तात विमानप्रवास योजना सुरू केली आहे. यामध्ये प्रति किलोमीटरनुसार दर आकारले जाणार आहेत. तुम्हाला देशांतर्गत विमानप्रवास करायचा असल्यास प्रतिकिमी १.७५ रुपये तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करायचा असल्यास २.५ रुपये प्रतिकिमी खर्च येणार आहे. मात्र, ठराविक कालावधीसाठी व मार्गासाठी ही ऑफर देण्यात आली आहे.
SpiceJet presents the Rs 1.75/km Sale. Fly at Rs 1.75/km for domestic flights & Rs 2.5/km for international flights. Domestic & international fares starting at Rs 899/- & Rs 3699/- respectively. Rush to the SpiceJet website or mobile app now! Sale closes 9th February. T&Cs Apply. pic.twitter.com/7RmFckC33X
— SpiceJet (@flyspicejet) February 5, 2019
स्पाईसजेट कंपनीच्या या ऑफरनुसार देशांतर्गत विमानप्रवास ८९९ रुपयांपासून सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमानप्रवास ३६९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. यासाठी ग्राहकांना कंपनीच्या मोबाईल अँपवर किंवा वेबसाईटवर ९ फेब्रुवारीपर्यंत बुकिंग करू शकणार आहात. ९ फेब्रुवारीपर्यंत बुकिंग केलेल्या तिकीटांवर २५ सप्टेंबर २०१९ पर्यंत प्रवास करता येणार आहे. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डद्वारे तिकीट बुक केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. यासाठी SBISALE या प्रोमो कोडचा वापर करावा लागणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..