नवी दिल्ली : 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन' ('ईव्हीएम') आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार असल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने सांगितले आहे. 'ईव्हीएम'बाबतीत आता माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहितीची मागणी करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना हा महत्वपूर्ण निर्णय माहिती आयोगाने घेतल्याने सर्वस्तरातून याचे स्वागत होत आहे. ईव्हीएम आणि निवडणूक यंत्रणेबद्दल विरोधकांकडून बऱ्याचदा आक्षेप घेण्यात येत होता. स्पष्टीकरणानंतर निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या अर्जावर आयोगाला उत्तर द्यावे लागेल किंवा कायद्यानुसार तो अर्ज नाकारावा लागेल. मात्र, त्यालाही माहिती आयोगापुढे आव्हान देता येणार आहे.
ईव्हीएमचा माहिती या संज्ञेखाली समावेश असून त्याविषयी माहिती निवडणूक आयोगाकडे मागता येईल, असा महत्वपुर्ण निर्णय मुख्य माहिती आयुक्त सुधीर भार्गव यांनी दिला आहे. ईव्हीएमचा माहिती या संज्ञेखाली समावेश असून त्याविषयी निवडणूक आयोगाकडे माहिती मागवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, माहिती कायद्याच्या कलम २ एफ आणि २ आयनुसार माहिती, दस्त व्याख्येमध्ये कोणतेही यंत्र किंवा नमुन्यांचा प्रकार येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच कलमानुसार माहिती नाकारणे चुकीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat