नवी दिल्ली : इंडियन ऑईल कॉरपोरेशनने (IOC) आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर तब्बल १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. कॅशलेस व्यवहाराला चालना मिळण्यासाठी कार्ड किंवा UPI ने पैसे भरल्यानंतरच ही ऑफर लागू असल्याचे इंडियन ऑईलने सांगितले आहे. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली.
The next time you stop at any IndianOil petrol pump, don’t forget to pay via your card, UPI and get a 10% cashback. #GoDigital and ditch cash to make quick, hassle-free and safe payments digitally. pic.twitter.com/86bZRuDh0e
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) February 13, 2019
इंडियन ऑईलची ही ऑफर ३१ मार्च पर्यंत असून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड किंवा यूपीआई द्वारे केलेल्या ट्रान्झेशनवर ५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. मात्र, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. दरम्यान, ही ऑफर ३१ मार्च पर्यंत असली तरी एक व्यक्ती जास्तीत जास्त सहा वेळेस व ३०० रुपयांपर्यंत कॅशबॅकचा लाभ घेऊ शकते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat