मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी दिलीप सपाटे

    01-Feb-2019
Total Views |

 

 

उपाध्यक्षपदी दीपक भातुसे तर कार्यवाहपदी विवेक भावसार यांची निवड


मुंबई : मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीची वार्षिक निवड नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवडून येत दिलीप सपाटे यांनी हॅट्रीक नोंदवली. तसेच, उपाध्यकपदी दीपक भातुसे आणि कार्यवाहपदी विवेक भावसार यांची निवड करण्यात आली.

 

अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिलीप सपाटे यांनी दिलीप जाधव यांचा ८० मतांनी पराभव केला. सपाटे यांना ११६ तर जाधव यांना ३३ मते मिळाली. याआधी सपाटे हे सलग दोनवेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या दीपक भातुसे यांनी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार संजीव शुक्ला यांचा ६६ मतांनी पराभव केला. भातुसे यांना ९५, शुक्ला यांना २९ व प्रफुल्ल साळुंखे यांना २४ मते मिळाली.

 

कार्यवाहपदी विवेक भावसार हे ६० मतांनी विजयी झाले. भावसार यांना १०३ व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार नेहा पुरव यांना ४३ मते मिळाली. कोषाध्यक्षपदी महेश पावसकर हे चंद्रकांत शिंदे यांचा २६ मतांनी पराभव करत विजयी झाले. पावसकर यांना ७०, शिंदे यांना ४४ व राजू झनके यांना ३२ मते मिळाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून विनय यादव, खंडूराज गायकवाड, अनिकेत जोशी, सचिन गडहिरे व कमलेश सुतार विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून राजन पारकर यांनी काम पाहिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/