१४ डिसेंबरला होणार तेजस्वी उल्कावर्षाव ; यावेळी दिसणार उल्का

    09-Dec-2019
Total Views | 337

tiger_1  H x W:


बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईकरांसह राज्यातील खगोलप्रेमींना येत्या शनिवारची संपूर्ण रात्र आकाशात तेजस्वी 'उल्का' पाहण्याची संधी मिळणार आहे. मिथुन राशीतून होणारा हा उल्कावर्षाव १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू होऊन पहाटे ४.३० वाजेपर्यत संपेल. हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या 'निसर्ग माहिती केंद्रा'कडून १४ डिसेंबरच्या रात्री खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

tiger_1  H x W: 
 

'उल्का' म्हणजे अवकाशातील धूळ आणि दगड आणि अनेक छोट्या अ-ग्रहीय वस्तू. अवकाशातील या वस्तू काही कारणाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात येऊन पृथ्वीकडे खेचल्या जातात. पृथ्वीकडे खेचल्या जाताना त्यांचा वेग प्रचंड वाढतो. त्यातच पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणाच्या थरामुळे या वस्तूंचे प्रचंड घर्षण होऊन त्या पेटतात आणि याच जळणाऱ्या 'उल्का' आपण आकाशात पाहतो. या 'उल्का' तेजस्वी किंवा रंगेबेरंगी दिसतात. येत्या शनिवारी या 'उल्का' पाहाण्याचा योग भारतीयांना आणि त्यातही खास करुन मुंबईकरांना मिळणार आहे. मिथुन राशीमधील हा उल्कावर्षाव १४ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास सुरू होईल. मिथुन राशीतील 'जेमिनिड्स' हा उल्कावर्षाव वर्षातील सर्वोत्तम, विश्वसनीय आणि दीर्घकाळ चालणाऱ्या वर्षावांपैकी एक मानला जातो. कारण यामध्ये मंदगती, बहुरंगी व तेजस्वी उल्का दिसतात. महत्त्वाचे म्हणजे डिसेंबर महिन्यात मिथुन रास संपूर्ण रात्रभर आकाशात दिसते व हिवाळा असल्याने भारतात आकाशही निरभ्र असते.

 
 
 
 
 

हा उल्कावर्षाव पाहण्याची संधी बोरिवलीच्या नॅशनल पार्क प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. १४ डिसेंबरच्या रात्री खगोलप्रेमींनीसह सामान्य मुंबईकरांना उल्कावर्षाव दाखविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते १५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत हा कार्यक्रम घेण्यात येईल. यामध्ये ताऱ्यांचे निरीक्षण आणि मध्यरात्री उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती नॅशनल पार्कचे शिक्षण अधिकारी जयेश विश्वकर्मा यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रवेश शुल्क दोन हजार रुपये असून यामध्ये रात्रीचे जेवण, राहण्याची सोय, प्रवास खर्च आणि सकाळच्या न्याहरीचा समावेश आहे. १८ वर्षांवरील लोकांना या कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 022-2886 8686 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 
 

धूमकेतूमुळे उल्कावर्षाव

सूर्याजवळून जाताना कुठल्याही धूमकेतूला एक धूळ, दगड, वायू, बर्फ यांचे मिश्रण असणारी एक शेपटी फुटते. या शेपटीमधील द्रव्य धूमकेतू आपल्याबरोबर परत घेऊन जात नाही. हे द्रव्य धूमकेतूच्या कक्षेत तसेच पडून राहते. आणि धूमकेतू पृथ्वीची कक्षा छेदत जाऊन सूर्याभोवती स्वत:ची प्रदक्षिणा पूर्ण करीत असतो. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहिल्यास आपणास एक गोष्ट लक्षात येईल की अशा एखाद्या धूमकेतूने मागे सोडलेला हा 'कचरा' त्याच्या कक्षेत पडून राहिलाय. पृथ्वी आपल्या नेहेमीच्या कक्षेत फिरत फिरत त्या ठिकाणी आली, की हा कचरा गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे ओढला जातो. या कचऱ्यातल्या धुळीचा प्रत्येक कण हा वातावरणामुळे घर्षण होऊन पेटतो आणि आपल्याला उल्का दिसतात. मिथुन राशीतील उल्कापात मात्र अपवादात्मक आहे. कारण तो कोणत्याही धूमकेतूमुळे नाही तर '३२०० फायथन' नामक लघुग्रहामुळे होतो. यातील उल्का सुमारे ३८ किमी उंचीवर नष्ट होतात.

पृथ्वीच्या वातावरणात सुमारे १००किमी वरून जळत येताना या उल्का वातावरणातच संपून जातात. पण काही उल्का वातावरणाचा थर पार करून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. आणि विलक्षण वेगाने पृथ्वीवर आदळून एक मस्तपैकी मोठ्ठा खड्डा बनवतात ज्याला आपण 'क्रेटर' म्हणतो. असे क्रेटर बनवून घन स्थितीत शिल्लक राहिलेल्या उल्केला आपण 'अशनी' म्हणतो. पृथ्वीवर असे अनेक क्रेटर आपणास पहावयास मिळतील. त्यापैकी 'बॅरिंजर' हे सर्वात मोठे क्रेटर अ‍ॅरिझोना राज्यात आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 'लोणार' येथे एक क्रेटर आहे. तसेच सायबेरियाच्या जंगलात १९०८ साली उल्का पडून एक मोठे क्रेटर तयार झाले आहे.

 

उल्काचे निरीक्षण कसे करावे?

* मोकळ्या आणि उंच ठिकाणी सरळ झोपून आकाशाकडे पाहात राहावे.

* सभोवती क्षितीजापर्यंतचे आकाश दिसत असल्यास फार उत्तम.

* उल्कानिरीक्षण हे उघड्या डोळ्यांनीच करावे. द्विनेत्रीची गरज नाही.

* शक्यतो आजुबाजूने येणारा दिव्यांचा उजेड नसावा. या प्रकाशामुळे अंधुक उल्का दिसत नाहीत.

* 'नासा' सारखी काही संकेतस्थळे अलिकडे इंटरनेटवर उल्कावर्षांवांचे थेट प्रसारण करतात.

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121