डर लगता है..

    29-Dec-2019   
Total Views | 381


gulzar_1  H x W



पण देशाला जाळू पाहणार्‍यांच्या टोळक्यात ते सामील आहेत. ‘सीएए’ कायदा कुणाही भारतीयांच्या विरोधात नसतानाही गुलजार या कवीने म्हटले की, ‘’दिल्लीवाल्यांची भीती वाटते, माहिती नाही ते कोणते कायदे आणतील?” गुलजार शिकलेले असतीलच.



इससे डर लगता है
,उससे डर लगता है

पता नही किस किससे डर लगता है

डरा हुआ हूँ मैं।

डर के पुरे देश को डरा रहा हूँ मै॥

खरेच आहे, घाबरणार्‍या लोकांचे काही खरे नसते. ते स्वतः घाबरतात आणि स्वतःसोबत कुणीतरी असावे म्हणून दुसर्‍यांनाही घाबरवतात. त्यांच्या घाबरण्याचीही एक गुणवत्ता असते. म्हणजे कसे असते की, भित्र्या सशाच्या पाठीवर झाडाचे पान पडते, तर त्याला आकाश कोसळल्यासारखे वाटते, पण लबाड कोल्ह्याच्या अंगावर झाडाचे पानही पडले नसेल, तरीही आकाश कोसळले, आकाश कोसळणार, मेलो मेलो, तुम्ही मरणार, आपण सारे मरणार.. असे बोंबलणार्‍या लबाड कोल्ह्याची भीती कोणत्या गुणवत्तेत येतेलबाड कोल्ह्याची भीती ही कोणत्याही गुणवत्तेत न येता लबाड खोटारडेपणा याच गुणवत्तेमध्ये येते. सध्या देशात लबाड कोल्ह्यांची कोल्हेकुई सुरू आहे.



पण देशाला जाळू पाहणार्‍यांच्या टोळक्यात ते सामील आहेत
. ‘सीएए’ कायदा कुणाही भारतीयांच्या विरोधात नसतानाही गुलजार या कवीने म्हटले की, ‘’दिल्लीवाल्यांची भीती वाटते, माहिती नाही ते कोणते कायदे आणतील?” गुलजार शिकलेले असतीलच. ‘सीएए’बद्दल त्यांना चांगलीच माहिती असेल. पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करावा म्हणून त्यांनी असे वक्तव्य केले आहे. पूर्वग्रहरहित सत्य आणि न्यायिक विचारांची अपेक्षा साहित्यिक विचारवंतांकडून असते. पण छे! नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले. देशभर नव्हे, तर जगभर त्यांना समर्थन मिळत आहे. यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आहे. या लोकांच्या कंपूत गुलजार अगदी अग्रभागी आहेत. पोटशूळ आणि मत्सरग्रस्त असे हे लोक देशात अस्थिरता माजवण्यासाठी काहीबाही अफवा पसरवत आहेत. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काही लोक रस्त्यावर दहशतवाद पसरवत आहेत. त्यांना उकसवणारे आहेत ते याच स्तराचे तथाकथित स्वयंघोषित विचारवंत आणि साहित्यिक. यांचे साहित्य, यांचे विचार समाजात जागृती आणण्याऐवजी समाजात अस्थिरता निर्माण करतात. या असल्या लोकांना वाटणारी ‘भीती’ ही दुसर्‍यांना ‘भीती’ दाखविण्यासाठीच असते.



ये डर हमे अच्छा लगा
!



‘जो डर गया, समझो मर गया।’ एक प्रसिद्घ वाक्य. आपल्या मायमराठीमध्येही अशीच म्हण आहे की, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. सध्या काही लोकांना फारच भीती वाटू लागली आहे, पण त्यांना विचारले की, कसली भीती? तर त्यांच्याकडे उत्तर नसते. कारण, मेंढ्यांच्या कळपात मेंढ्या जशा एकापाठोपाठ जात राहतात, तशी यांची मानसिक भीती आहे. मेंढ्यांचा राखणदार तरी बिचारा मेंढ्यांची काळजी घेतो. पण, उगाचच घाबरून एकमेकांना सोबत करत रस्त्यावर उतरणार्‍यांचे मेंढपाळ इतके चांगले नाहीत. ते मेंढपाळ नाहीत तर कसाई आहेत. पण छे! कसाई तरी पोटापाण्यासाठी गुराढोरांचा जीव घेतो. हे लोकांच्या मनात भीती पसरवणारे मेंढपाळ, हे कसाईही नव्हेत. हे तर समाजद्रोहीच!



काही समाजगट आपले ऐकतात
, म्हणून त्या समाजगटांना काहीही खोटीनाटी माहिती द्यायची. त्यांच्या भावना भडकवायच्या. त्यांना भीती दाखवायची. ही भीती इतकी दाखवायची की, या समाजगटाला वाटावे की, आता समोरच्याला कसेही करून नमवावेच, समोरच्याचा खात्मा करावाच, तरच आपले अस्तित्व टिकेल. ही भीती स्वातंत्र्यपूर्व काळातही बॅरिस्टर जिनांनी दाखवली होती. त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत. आता या देशात दुसरा जिना तयार होणे अशक्य आहे, पण तरीसुद्धा काही महाभाग तसे होण्याची स्वप्ने पाहत आहेत. धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचे स्वप्न काही नालायक आजही पाहत आहेत. ही त्यांची दिवास्वप्नेच आहेत, पण या दिवास्वप्नांसाठी ते देशाचे आणि समाजाचेही नुकसान करत आहेत. अर्थात आता देशाचे नागरिक जागरूक झाले आहेत. काय चांगले, काय वाईट हे ओळखण्याची कुवत आणि शक्ती त्यांच्यामध्ये आली आहे. त्यामुळे देशविरोधी वातावरण तयार करण्याचे कृत्य या पारंपरिक देशविघातकांनी केले की, देशाची सज्जनशक्ती न सांगता एकवटते. देश हमे देता है क्या? ही भाषा बोलणार्‍यांना ही सज्जनशक्ती सांगते, ‘तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे.’ देशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात सज्जन शक्ती एकत्रित झाली आहे. त्यामुळेच देशाचे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणार्‍यांच्या दिलाचे आज तुकडे होत आहेत. त्यामुळेच ते घाबरले आहेत. यावर लोक म्हणतात, ‘देश को डरानेवालों का ये डर हमे अच्छा लगा!’

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121