सुमित राघवन सांगतोय, ऐका ‘एकदा काय झालं...’

    26-Dec-2019
Total Views | 100

sumeet_1  H x W


अभिनेता सुमित राघवनने नुकतेच त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर केले. एकदा काय झालं’ असे या चित्रपटाचे नाव असून, प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि एका माणसाची प्रतिमा दिसते. त्यावरुन चित्रपट एका बाप-मुलाच्या नात्यावर आधारित असू शकतो असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत.





मात्र एकदा काय झालं..ह्या नावातूनच या चित्रपटाचे वेगळेपण जाणवते आणि एका अगदी नवीन कोऱ्या विषयावरचा एक संवेदनशील चित्रपट आपल्याला बघायला मिळेल अशी खात्री वाटते. या चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पोस्टरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात सुमित राघवनसह उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, प्रतीक कोल्हे, मुक्ता पुणतांबेकर, आकांक्षा आठल्ये, रितेश ओहोळ, अर्जुन पुर्णपात्रे, अद्वैत वाकचौडे, अद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 


sumeet_1  H x W



गुरुवारी एकदा काय झालंया चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे आणि सौमेंदु कुबेर यांच्या शो बॉक्स एंटरटेन्मेंटतर्फे आणि अरुंधती दात्ये, अनुप निमकर, डॉ. सलील कुलकर्णी आणि नितीन प्रकाश वैद्य यांच्या गजवदन प्रॉडक्शन्स तर्फे होत आहे. पहिल्या चित्रपटाप्रमाणेच डॉ. सलील कुलकर्णीएकदा काय झालंमध्येही लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121