नवी दिल्ली : केंद्र सरकारने लाखो विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी खासकरुन अशा विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे जे देशातील कोणत्याही नवोदय विद्यालयात (एनव्हीएस - नवोदय विद्यालय समिती) किंवा केंद्रीय विद्यालय (केव्ही - केंद्रीय विद्यालय) मध्ये प्रवेश घेण्यास इच्छूक आहेत. मानव संसाधन विकास मंत्रालयाने (एमएचआरडी - मानव रिसोर्स अँड डेव्हलपमेंट मंत्रालय) या संदर्भात माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आरक्षणामध्ये वाढ करण्यातआली आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या मते, शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये नवोदय आणि केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश घेणार्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण वाढीस मान्यता देण्यात आली आहे.
या शाळांमधील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय येत्या शैक्षणिक सत्रापासून नवोदय विद्यालयात लागू केला जाईल. यासंदर्भात मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की,"ओबीसी विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्याच्या शैक्षणिक सत्राचा जवळपास निम्मा वेळ निघून गेला आहे, त्यामुळे पुढील सत्रापासून हा नियम देशातील सर्व मध्यवर्ती व नवोदय शाळांमध्ये लागू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. ओबीसी आरक्षण इतर कोणत्याही आरक्षणांप्रमाणे प्रमाणे पहिली पासूनचा प्रवेशासाठीच लागू असेल.