आंध्रप्रदेश : नव्या आंध्र प्रदेश राज्याच्या तीन अधिकृत राजधान्या असतील, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी मंगळवारी विधानसभेत केली. सत्तेचे आणि कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे, परंतु आता आंध्र प्रदेशने आपली नवीन राजधानी बनवण्याची घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेशच्या तीन राजधानी असतील आणि या राजधान्या स्वतंत्रपणे कार्य करतील. कार्यकारी, न्यायिक व विधानमंडळ अशी त्यांची विभागणी केली जाईल, असे जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. तसेच राज्याला तीन राजधान्यांची गरज असून त्याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. याबाबत विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.
अमरावती (राजकीय), विशाखापट्टणम (कार्यकारी), कुरुनुल (न्यायिक) ही शहरे संभाव्य राजधानीसाठी निवडली जाणार आहेत.