'माझी जन्मठेप' वाचल्यानंतर राहुल गांधी बेताल वक्तव्य करणार नाहीत : शिवसैनिक

    16-Dec-2019
Total Views | 57

savarkar_1  H x



मुंबई – राहुल गांधीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्या टीकेची झोड उठत असतानाच, विलेपार्लेमधून राहुल गांधीना शिवसैनिकांनी स्वातंत्रवीर सावरकरांचे आत्मचरित्र पाठवत आपला निषेध जाहीर केला.


विलेपार्ले शिवसेना उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे राहुल गांधीचा निषेध करत त्यांना ‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्राची प्रत पोस्टाने पाठवली. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेज, त्याग आणि धाडस.
राहुल गांधीनी हे पुस्तक वाचल्यास त्यांना सावरकर नक्की कळतील. त्यांना सावरकरांविषयी माहिती मिळेल आणि ते अशी बेताल वक्तव्य करणार नाहीत, असा खरमरीत टोला देखील त्यांनी लगावला.





इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्यावरील टपाल तिकिटाच अनावरण केले होते तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी अंदमान येथील सावरकर स्मारकाचे भूमिपूजन केले होते. काँग्रेसच्या या दोन पंतप्रधानांना सावरकर नावाची ताकद कळली, मात्र त्यांच्या वंशजाला ते कळले नाहीत हे दुर्दैव आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधीवर टीका केली.


 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121