नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत ईशान्य भागात विरोध आहे. दरम्यान, भारतीय सैन्याबद्दल अनेक दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सैनिकांवर लोकांचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात लष्कराने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये लोकांना बनावट बातम्यांपासून सावध रहाण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय लष्कराने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सामान्य लोकांना आवाहन केले आहे की,'अशा बनावट बातम्यांपासून सावध रहा ज्या संशयास्पद लोकांद्वारे पसरविल्या जात आहेत.' लष्कराने ट्वीट करून लिहिले आहे की, "काही समाजकंटकांद्वारे सोशल मीडियावर खोट्या बातम्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. अफवा टाळा, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्याकडे लक्ष देऊ नका. भारतीय सेना - देशाची सेना."
'खोटा प्रसार टाळा'
भारतीय लष्कराने त्यांच्या ट्वीटद्वारे सैन्यासमोर हॅशटॅग वापरला आहे. लष्कराने ट्विटसह काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. सैन्याने फोटोवर लिहिले आहे की हजारो खोटी बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना टाळा.
'झूठ और दुष्प्रचार से बचें'
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) December 14, 2019
झूठी खबरें और दुष्प्रचार सोशल मीडिया पर कुछ अहितकर तत्वों द्वारा फैलाया जा रहा है।
झूठी अफवाहों से बचे, झूठी खबरों को न सुने न देखें, न उस पर ध्यान दें।
भारतीय सेना - देश की सेना#IndianArmy#NationFirst pic.twitter.com/LVKbkz230Z