बँकांत विनाकारण जास्त खाती नको

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2019   
Total Views |





प्रत्येक व्यक्तीची बँकांत कमाल दोन ते तीनच खाती असावीत
, असा फतवा केंद्र सरकारचे अर्थ खाते काढणार आहे, अशा बातम्या मध्यंतरीच्या काळात माध्यमात येत होत्या. लोकही यावर चर्चा करीत होते. पण, अशा तर्‍हेचा फतवा अजून निघालेला नसला तरी बँकांत विनाकारण जास्ती खाती उघडू नका. असे का, ते आजच्या लेखात जाणून घेऊया...


जागतिक बँकेच्या २०१७च्या
ग्लोबल फिनडेक्स’च्या अहवालानुसार, २०१६ मध्ये भारतात असलेल्या बँक खात्यांपैकी निम्मी बँक खाती कार्यरत (इनअ‍ॅक्टिव) नव्हती. या खात्यांत व्यवहार होत नव्हते. एवढेच नाही तर व्यवहार न होणार्‍या खात्यांचा विचार केला, तर जागतिक पातळीवर भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यानिमित्ताने अधोरेखित झाले.



तुमची बँकांमध्ये जितकी जास्त बचत खाती असतील
, त्यात असलेल्या पैशांवर तुम्हाला फार कमी दराने म्हणजे दरसाल दर शेकडा साडेतीन टक्के दराने व्याज मिळते. काही बँका याहून अधिक व्याजदर देतात. पण, साडेतीन टक्के दरानेच व्याज देणार्‍या बँकांचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक खात्यात किमान रक्कम ठेवावी लागते व ती न ठेवल्यास दंड आकारला जातो. सार्वजनिक उद्योगातील बँकांमध्ये किमान १ हजार रुपये शिल्लक चालते, पण न्यू जनरेशन बँकांत, खाजगी बँकांत, तसेच परदेशी बँकांत ५ ते १० हजार रुपयांपर्यंत किमान ठेव ठेवावी लागते. समजा, तुमची अशा बँकांमध्ये पाच खाती आहेत, तर या पाच खात्यांमुळे तुमचे २५ ते ५० हजार रुपये अडकून पडू (ब्लॉक) शकतात. या रकमेवर तुम्हाला फक्त तीन ते चार टक्के दराने व्याज मिळते. हीच रक्कम जर तुम्ही मुदत ठेवीत ठेवलीत, तर ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. बचत खात्याबरोबर प्रत्येक ग्राहकाला डेबिट कार्ड दिले जाते. तुमची जितकी बचत खाती असतील, तितक्या खात्यांचे डेबिट कार्ड शुल्क तुम्हाला भरावे लागते. परत या कार्डांची सुरक्षितताही पाहावी लागते. तसेच हल्ली तुम्ही केलेल्या डेबिट तसेच क्रेडिट व्यवहारांचा तपशील बँक तुम्हाला ‘एसएमएस’ करते. यासाठी बँक तुम्हाला एसएमएस अलर्ट शुल्क आकारते. तुमचे खाते जितक्या बँकांत असेल, तितक्या बँकांना तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल. तुमचे जर शून्य शिल्लक खाते असेल, ज्यात तुमचा पगार जमा होत असेल व समजा काही कारणांनी या खात्यात तीन महिने तुमचा पगार जमा झाला नाही, तर हे शून्य शिल्लक खात्याचे रूपांतर नेहमीच्या बचत खात्यात होते व नंतर तुम्हाला खात्यात किमान शिल्लक ठेवावीच लागते.



जर तुम्ही खात्यात दोन किंवा तीन वर्षे काही व्यवहार केलेे नसतील
, तर बँक तुमचे खाते ‘डॉरमन्ट’ समजले जाते. त्यानंतर मग तुम्ही डेबिट कार्ड, चेक, ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. हे खाते पूर्ववत करायला तुम्हाला लेखी अर्ज द्यावा लागतो. जर खाते संयुक्त असेल तर सर्व खातेदारांच्या त्या अर्जावर सह्या असाव्या लागतात. आयकर रिटर्न फाईल करतानाही अनेक खाती असतील तर जास्त माहिती द्यावी लागते. खाती कमी असतील, तर आयकर रिटर्न फाईल करण्याची प्रक्रिया सोपी ठरू शकते. ऑनलाईन व्यवहारांसाठी प्रत्येक बँकेचा ‘पासवर्ड’ लक्षात ठेवा, सुरक्षिततेच्या दृष्टीने तो सतत बदलत राहा, हे करावे लागते. दोन बचत खाती असणे हे आदर्श मानले जाते. एक पगार जमा होण्यासाठी खाते असावे व दुसरे पालक किंवा पती/पत्नी यांच्याबरोबर संयुक्त खाते असावे. या खात्यात तुम्ही अचानक लागणारा पैसा ठेवू शकता व खाते संयुक्त असेल तर गरजेच्यावेळी किंवा निकडीच्या वेळी तुमचे कुटुंबीय पैसे काढू शकतात. तीन खातीही उघडू शकता, पण तीन ही कमाल मर्यादा हवी, याच्यापुढे जाता कामा नये. यात एक कायमचे खाते, दुसरे भागीदार किंवा पती/पत्नीबरोबर संयुक्त खाते व तिसरे पगार जमा होण्यासाठी खाते.



काही काही कंपन्या सर्व कर्मचार्‍यांचे पगार एकाच बँकेत जमा करतात
. त्यामुळे नोकरी बदलली की, तुम्हाला त्याप्रमाणे पगार जमा करण्यासाठी संबंधित बँकेत खाते उघडावे लागते. कित्येक जण नव्या कंपनीचा पगार जमा होण्यासाठी नवे खाते उघडतात, पण जुने खाते बंद करीत नाहीत. त्यामुळे विनाकारण खात्यांची संख्या वाढते. त्यामुळे एक वेगळे कायमचे खाते ठेवा. यातून तुमचे आरोग्य/जीवन विमा प्रीमियम, इतर गुंतवणुकी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी इत्यादी या खात्याला संलग्न करू शकता. बँका सध्या प्रत्येक प्रकारच्या सेवेला शुल्क आकारतात. त्यामुळे अनेक खाती असल्यास तुमचा पैसाही शुल्क भरण्यात खर्च होतो. कमी खाती असतील तर तुम्हाला त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. त्यात किती शिल्लक आहे, तुम्हाला किती तरतूद करावयाची आहे, हे तुमच्या लक्षात येते. आता ‘युनिव्हर्सल अकाऊंट नंबर’ (युएएन) तुमचा ईपीएफ (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी) ‘आयडी’ असतो. तुम्ही प्रत्येक वेळी नोकरी बदलल्यावर नवे ईपीएफ खाते उघडावे लागत नाही. पण, प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचे बँक खाते ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निधी कार्यालय) बरोबर ‘अपडेट’ करावे लागणार.



परमनंट बँक खाते प्रमुख ऑपरेटिंग खाते असावयास हवे
. तुमच्या वित्तीय जीवनासाठी बँक खाते, पॅन व आधार हे महत्त्वाचे ओळख पुरावे आहेत. करभरणा गुंतवणूक, युटिलिटी बिल भरणे, या सर्वांसाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. पॅन व आधार ‘केवायसी’साठी संलग्न असावयास हवे. एकच परमनंट खाते ठेवा व ते सर्व आर्थिक व्यवहारांसाठी संलग्न करा व या संलग्न असलेल्या खात्यातूनच ईपीएफ, पीपीएफ, म्युच्युअल फंड, डिमॅट खात्यातील व्यवहार, मासिक बिल वगैरे भरा. नको असलेली खाती बंद करणे म्हणजे तुमच्या खात्यात गैरव्यवहार होण्याची शक्यता कमी, हे लक्षात घ्या. कमी खाती असल्यास व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. आयकर रिटर्न फाईल करणे सोपे जाते. जमा व येणारे व्याज रिटर्नमध्ये दाखविणे सोपे होते. तुम्ही एखाद्या खात्यात जर तीन ते चार महिने व्यवहार केले नसतील, तर हे खाते चालू ठेवण्यात काहीही तथ्य नसून असे खाते त्वरित बंद करावे. नवीन नोकरी लागल्यावर पगार जमा होण्यासाठी नव्या बँकेत खाते उघडल्यास, जुने खाते दोन महिने झाल्यानंतर बंद करावे. जर तीन महिन्यांहून अधिक काळ त्यात पगार जमा झाला नाही व तुम्ही बंदही केले नाही तर ते नियमित खाते होते व या खात्याला किमान शिल्लक रकमेचा नियम लागू होतो.


बँक खाती बंद कशी करावीत?

खाते बंद करण्यापूर्वी त्या खात्यात काही चेक येणार नाहीत ना
, काही डेबिट किंवा के्रडिट्स यायची नाहीत ना, याची खात्री करून घ्या. नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (एनएसीएच)ला दिलेली ‘मॅन्डेटस्’ असंलग्न करून घ्या किंवा नव्या खात्याशी संलग्न करा. दोन किंवा जास्तीत जास्त तीन बचत खाती ठेवा. याहून जास्त बचत खाती ठेवणे म्हणजे आपला पैसा व्यर्थ घालवणे होय, हे लक्षात ठेवा. बँक खाती बंद कशी करावीत? बँकांचे खाते बंद करण्यासाठी फॉर्म असतात. हा फॉर्म तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन मिळवू शकता किंवा बँकेच्या वेबसाईटवरूनही डाऊनलोड करु शकता. जर खाते संयुक्त असेल तर खाते बंद करावयाच्या फॉर्मवर सर्व खातेदारांना सह्या कराव्या लागतात. जर खाते बंद करताना असलेली शिल्लक दुसर्‍या खात्यात ट्रान्सफर करावयाची असेल, तर त्यासाठी आणखी एक फॉर्म सही करून द्यावा लागतो.



तुम्हाला खाते बंद करताना उरलेले चेक
, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी परत करावे लागते. जर तुम्ही एका वर्षाच्या आत खाते बंद केले तर बँका खाते बंद करताना काही शुल्क आकारतात. तुम्ही खाते उघडल्यापासून जर खाते १४ दिवसांत बंद केले, तर स्टेट बँक अशावेळी काहीही शुल्क आकारत नाही. १५ दिवसांपासून १ वर्षाच्या आत खाते बंद केले तर ही बँक ५०० रुपये शुल्क आकारते व यावर नियमाप्रमाणे जीएसटीही भरावा लागतो. खाते उघडल्यापासून एक वर्षानंतर बंद केले तर काहीही शुल्क आकारले जात नाही. रिझर्व्ह बँकेचे या संबंधित काही नियम नसून, बँकांना खाते बंद करताना किती शुल्क लावायचे, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे हे शुल्क प्रत्येक बँक वेगवेगळ्या दराने आकारते. तुमचा खाते बंद करण्याचा फॉर्म बँकेकडे गेल्यावर, तुम्ही बँकेचे काही पैसे देणे लागता का, याची तपासणी होते. जर देणे लागत असाल तर त्याची पूर्ण वसुली झाल्यानंतरच खाते बंद केले जाते. खाते बंद करण्याचा अर्ज दिल्यावर, त्यांच्याकडून अर्ज मिळाल्याची सही घ्या.



तुमचे बचत खाते जर पेमेंट्स प्लॅटफॉर्म किंवा सर्व्हिस अ
‍ॅप्सना संलग्न असेल ते म्हणजे पेटीएम, उबेर किंवा स्विगी वगैरे वगैरे, तर ते असंलग्न करून घ्या. फंड्स इंडिया, स्क्रीपबॉक्स अशा गुंतवणूक पोर्टल्सशी संलग्न असेल तर तेही असंलग्न करून घ्या. युपीआय पेमेंट बँक खात्यातून करावे लागते व हे तुमच्या मोबाईल क्रमांकाशी संलग्न असते. त्यामुळे बँक खाते व मोबाईल क्रमांक दोन्ही युपीआय पेमेंटपासून असंलग्न करा. दुसर्‍या खात्याशी तत्काळ संलग्न करा. परिणामी, तुमचे ईएमआय पेमेंट किंवा गुंतवणुकीचे हप्ते जाण्यात अडथळे येणार नाही. डिलिंक किंवा असंलग्न करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे पण काही ठिकाणी तुमच्याकडून फॉर्मही भरून घेतला जाऊ शकतो. खाती दोन ते तीनच ठेवा. सेवा शुल्क जास्त भरावयाचे नसतील तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाच प्राधान्य द्या.

@@AUTHORINFO_V1@@