मुंबईकरांनो घ्या आनंद 'फ्लेमिंगो सफारी'चा !

    16-Nov-2019   
Total Views | 381



एरोलीतून ठाणे खाडीच्या जलसफरीचा अनुभव ; जैवविविधतेचेही दर्शन


मुंबई (अक्षय मांडवकर) - मुंबई, ठाण्यात अद्याप थंडीची चाहूल लागली नसली तरी या शहरांतील खाडी परिसरावर मात्र गुलाबी पंखांची चादर पसरली आहे. दरवर्षी न चुकता मुंबई-ठाण्याच्या खाडीत मुक्कामाला येणारे रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले असून पर्यटकांना या पक्ष्यांना अगदी जवळून न्याहाळता येणार आहे. वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह सेल'च्या वतीने या आठवड्यापासून ऐरोली येथून ठाणे खाडीची बोटसफर आणि फ्लमिंगो दर्शन सफारी सुरू करण्यात आली आहे.

 
 

 
 
 

खारफुटी आणि सागरी परिसंस्थेच्या जैवविविधतेविषयी माहिती देणारे किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र’ 'मॅंग्रोव्ह सेल'ने ऐरोली खाडीलगत उभारले आहे. या केंद्रात माहिती देणारी दोन मोठी दालने असून खेकडय़ांची शेती, कांदळवन सफर, खाडी निरीक्षण, फ्लेमिंगो दर्शन फेरी असे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात. या माध्यमातून वन विभागाच्या खात्यात उत्पन्न जमा होते. दरवर्षी १,६९० हेक्टरवर पसरलेल्या फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा लाभलेल्या ठाण्याच्या खाडीत गुजरातच्या कच्छच्या रणातून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत हे पक्षी मोठय़ा संख्येने दाखल होतात. या पक्ष्यांचे दर्शन घडविण्याच्या हेतूने 'मॅंग्रोव्ह सेल' गेल्या तीन वर्षांपासून ठाणे खाडीत फ्लेमिंगो सफारीचे आयोजन करत आहे.

 
 

 

पक्षिनिरीक्षक आणि सामान्य पर्यटकांना फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन करता यावे याकरिता 'मॅंग्रोव्ह सेल' गेल्या दोन वर्षांपासून ऐरोलीच्या केंद्रातून फ्लेमिंगो सफारीचे आयोजन करत आहे. थंडीची चाहूल लागली नसली तरी खाडीत अंदाजे तीन हजार फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्याने आम्ही १५ नोव्हेंबरपासून फ्लेमिंगो सफारीला सुरुवात केल्याची माहिती 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'चे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. तसेच गेल्यावर्षी ‘फ्लेमिंगो दर्शन फेरी’च्या माध्यमातून २५ लाख, ४५ हजार रुपयांचे उत्पन्न गोळा झाल्याचे त्यांनी सांगितले. फ्लेमिंगो सफारीची नोंदणी करण्यासाठी 9987673737 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकरे यांनी पर्यटकांना केले आहे. 

 

फ्लेमिंगो दर्शन असे 

* ऐरोली केंद्रातून फ्लेमिंगो दर्शनासाठी ठाणे खाडीत सोडल्या जाणाऱ्या बोटींच्या साहाय्याने पर्यटकांना १० किलोमीटर खाडी परिसरात विहार करणाऱ्या फ्लेमिंगोचे दर्शन घडविले जाईल.

* यासाठी साधारण ४५ मिनिटांचा कालावधी लागेल.

* केंद्रामध्ये २४ व्यक्तींसाठी आसनव्यवस्था असलेली बोट आहे. यासाठी प्रतिव्यक्ती ३३० (सोम ते शुक्र) रुपये आकारण्यात येतील, तर शनिवार-रविवारी फेरी शुल्क ४४० रुपये असेल.

* कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत एकत्र फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी सात आसनी ‘कौस्तुभ’ नावाची बोट उपलब्ध आहे. ही खासगी बोटफेरीकरिता पर्यटकांना पाच हजार रुपये मोजावे लागतील.

* अत्याधुनिक पद्धतीने मांडणी करण्यात आलेल्या 'किनारी व सागरी जैवविविधता केंद्रा'चे शुल्क ५० रुपये आहे.

 
 
एरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्राचे गुगल लोकेशन 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121