नवी दिल्ली : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. "सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रपुरुष असून कोणत्याही पक्षाचे नव्हे तर देशाचे नेते होते." असा पलटवार भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी प्रियांका गांधींवर केला आहे.
प्रियांका गांधींकडून सरदार पटेलांना अभिवादन नाहीच ! मात्र, भाजपवर टीका सुरूच#PriyankaGandhi Priyanka Gandhi Vadra #SardarVallabhbhaiPatel #IronMan #JammuAndKashmir #RunForUnity #Ladakh #StatueOfUnity https://t.co/AitbE1tBSJ
— महा MTB (@TheMahaMTB) October 31, 2019
ते म्हणाले, "कॉंग्रेसकडून प्रत्येक योजना असो किंवा कुठलीही सरकारी इमारत त्याला एकाच परिवाराचे नाव देण्यात येत होते. जितका अपमान सरदार वल्लभभाई पटेल यांचा कॉंग्रेसने केला. त्याहून कित्येकपटींनी सन्मान मोदी सरकारच्या काळात देण्याचा प्रयत्न झाला आहे."
"सरदार पटेल महात्मा गांधी यांच्या मताचे होते, त्यांनी स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस विसर्जित करण्यावर भर दिला होता. सरदार पटेल हे राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या हाथ-छाप कॉंग्रेसचे सदस्य नव्हते. सरदार पटेल यांनी संपूर्ण भारत एकसंध व्हावा म्हणून प्रयत्न केले. नेहरूंच्या चुकांमुळे जम्मू काश्मीरची जनता अजूनही परिणाम भोगत आहे."
'महाकूट' म्हणजे एक मोठा संच! कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील छोट्या शहरात वसलेल्या या महाकुटच्या मंदिरांचा समूह सहाव्या ते आठव्या शतकात बांधला गेला.
— महा MTB (@TheMahaMTB) October 31, 2019
भगवान शंकराला समर्पित हे धार्मिक स्थान भारतीय परंपरा व संस्कृतीचे प्रतीक आहे. #MahaMTB
आजच ऑर्डर करा : https://t.co/FNCihdB4qi pic.twitter.com/zp9MxRyHdk