मुंबई ः भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर नेहमी ‘ईव्हीएम’ मशीनवर शंका उपस्थित करणारे विरोधक आता ‘ईव्हीएम’वर का बोलत नाही? असा सवाल विधानसभा निवडणूक निकालानंतर जनमानसांतून विचारला जात आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांचे संख्याबळ वाढले. यामुळे विरोधकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. या परिस्थितीत आत्तापर्यंत एकाही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केलेली नाही. संख्याबळ वाढल्याच्या निकालाने विरोधी पक्षांतील नेते खूशही दिसत आहेत. मात्र एकही विरोधी पक्षांतील नेता ईव्हीएमबाबत बोलताना दिसत नाही. त्यामुळे आता त्यांना ईव्हीएमच्या कार्यक्षमतेविषयी शंका का उपस्थित होत नाही, असा सवाल विचारला जात आहे. मागील लोकसभा निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकांआधी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणार्या विरोधकांनी निवडणूक निकालानंतर मात्र, ईव्हीएमवर शंका उपस्थित न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी यासंबंधी अनेकदा आरोप केले आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएमवर कोणत्याही पक्षाने शंका उपस्थित केली नाही. या दोन्ही निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच असे घडल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असे. महाराष्ट्र आणि हरयाणात झालेल्या निवडणुकांआधीही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, निवडणूक निकालानंतर हा मुद्दा अद्याप कुणीही उपस्थित केला नाही, किंवा तसे विधानही कुणी केल्याचं समोर आले नाही. निवडणूक निकालांआधी ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा दावा करणारे कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील निकालानंतरही चिडीचूप होते. ईव्हीएम हॅक होऊ शकते हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे यावेळच्या हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांनी सिद्ध करून दाखवल्याचे सर्वसामान्य सांगत आहेत.