आज सकाळी २८८ विधानसभा मतदारसंघातून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्यामुळे मतदानात थोडासा खोळंबा निर्माण झाला होता. मात्र मतदारांनी आत्तापर्यंत चांगल्या संख्येने महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ९६ हजार ६६१ मतदान केंद्रांवर हजेरी लावली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के एवढे मतदान झाले.
यामध्ये आरमोरी जिल्ह्यात सर्वात जास्त मतदानाची संख्या नोंदवण्यात आली असून तेथे ५२.८९ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान उल्हासनगर येथे झाले असून तेथे १५.७० टक्के मतदान झाले आहे. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या आकड्यांमुळे अधिक स्पष्टता आणण्यास मदत होईल.
दरम्यान हरियाणा राज्यात देखील मतदान झाले असून २८८ विधानसभा मतदारसंघातून ९० जागांसाठी तेथे आज मतदान घेण्यात आले. हरियाणा मध्ये देखील सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.