गडकरी, मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

    21-Oct-2019
Total Views | 32



नागपूर : राज्यभरात मतदारांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे. मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली असून अनेक दिग्गजांनी आपला हक्क बजावला. यावेळी, नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पत्नी कांचन गडकरी यांच्यासह दोन मुलांच्या कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केले.

 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात जे काम झाले आहे, त्याच्या जोरावर या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळेल. तसेच देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री होतील." असा विश्वास नितीन गडकरी यांनी दर्शविला. तसेच ते पुढे म्हणाले की, "जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, त्यापैकी कुणा एकाला तरी मतदान करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, नागरिकांनी नोटाचा उपयोग टाळणे हे देखील गरजेचे आहे. उपलब्ध उमेदवारांपैकी कोणीच नाही असे म्हणणे आजही लोकशाहीमध्ये योग्य आहे असे मला वाटत नाही."

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "महाराष्ट्रातील सर्वात मोठा महोत्सव आज आहे. मी सहकुटुंब मतदान केले आहे. मतदारांनीसुद्धा मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे. लोकशाहीत आपण ज्यांना निवडतो त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतात"

अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121