‘सिफिलिस’चा धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019   
Total Views |




जगभरातील संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या एड्सपासून सुटका कशी करून घ्यावी
, असे झालेले असतानाच त्यापेक्षाही भयानक आजाराची माहिती समोर आली आहे. विशेषज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार हा आजार वेगाने पसरत असून त्यामागचे कारणही एड्सप्रमाणेच असुरक्षित लैंगिक संबंध हेच आहे.



असुरक्षित लैंगिक संबंध
, एचआयव्हीबाधित व्यक्तीचे रक्त संक्रमण आणि तत्सम कारणांनी पसरणार्‍या एड्सवर अजूनही कोणतेही ठोस औषधोपचार उपलब्ध नाहीत. जगभरातील संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या एड्सपासून सुटका कशी करून घ्यावी, असे झालेले असतानाच त्यापेक्षाही भयानक आजाराची माहिती समोर आली आहे. विशेषज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार हा आजार वेगाने पसरत असून त्यामागचे कारणही एड्सप्रमाणेच असुरक्षित लैंगिक संबंध हेच आहे. जागतिक माध्यमांतील वृत्तांनुसार, या खतरनाक आजाराचे नाव ‘सिफिलिस’ असून गेल्या एका दशकातच त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ‘युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रीव्हेन्शन अ‍ॅण्ड कंट्रोल’च्या (ईसीडीसी) अहवालानुसार ‘सिफिलिस’वर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध गरजेचे असून केवळ स्त्री-पुरुषांनाच नव्हे, तर समलैंगिकांनाही या आजाराचा फास आवळू शकतो. २०१० पासून असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे या आजाराच्या प्रकरणांत ७० टक्क्यांहून अधिक वृद्धी झाली असून २०१६ साली यामुळे सर्वाधिक नवजात बालकांचा मृत्यूही झाला होता.




‘ईसीडीसी’मधील विशेषज्ज्ञ अ‍ॅण्ड्र्यू अमातो-गोची यांनी यासंबंधीची माहिती देताना सांगितले की, “युरोपसह जगातील अन्य देशांमध्ये ‘सिफिलिस’च्या वाढीची कितीतरी कारणे आहेत. साथीदारासह असुरक्षित लैंगिक संबंध, अनेकांशी लैंगिक संबंध आणि एचआयव्ही संक्रमणाची भीती न वाटणे, या कारणांचा त्यात समावेश आहे.” दरम्यान, ‘सिफिलिस’वर ‘ईसीडीसी’चा अहवाल येण्याआधीच एक महिन्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने एक पत्रक काढून जगभरात दररोज एक लाख लोक असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे तत्सम आजारांना बळी पडतात, असे म्हटले होते. विशेषज्ज्ञांच्या मते, ‘सिफिलिस’ स्त्री आणि पुरुष दोघांपुढेही एकसारख्या समस्येच्या रूपात उभी राहिली आहे. दुर्दैव म्हणजे, ‘सिफिलिस’मुळे नवजात बालकांचा जीवही जातो. तसेच ‘सिफिलिस’च्या विळख्यामुळे एड्सचा धोकादेखील वाढतो. आरोग्य व आजारासंबंधित युरोपियन संस्था-ईसीडीसीने सांगितल्यानुसार सन २००० नंतर एचआयव्हीशी तुलना करता सिफिलिसबाधितांची संख्या वाढली आहे. सन २००७ ते २०१७ दरम्यान जगातील ३० देशांत ‘सिफिलिस’ रुग्णांची संख्या २ लाख, ६० हजार इतकी होती. ‘सिफिलिस’ची सर्वाधिक ३३ हजार प्रकरणे २०१७ मध्ये समोर आली होती.



‘ईसीडीसी’च्या अहवालातील माहितीनुसार, ‘सिफिलिस’ची समस्या जगतील पाच देशांत सर्वात जास्त आहे. ब्रिटन, जर्मनी, आयर्लंड, आईसलंड आणि माल्टी ही त्या देशांची नावे असून तिथे सिफिलिसग्रस्तांची संख्या वैश्विक सरासरीपेक्षा दुपटीने वाढली आहे. केवळ अ‍ॅस्टोनिया आणि रोमानिया हेच दोन देश असे आहेत, जिथे ‘सिफिलिस’मध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे आढळले. इतकेच नव्हे, तर ‘ईसीडीसी’ने सांगितल्यानुसार सन २००७ ते २०१७ दरम्यान समोर आलेल्या ‘सिफिलिस’ प्रकरणांपैकी दोन तृतीयांश प्रकरणे समलैंगिक पुरुषांचे, २३ टक्के प्रकरणे स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवणार्‍या पुरुषांमध्ये आणि १५ टक्के प्रकरणे स्त्रियांमध्ये असल्याचे आढळले. लॅट्व्हिया, लिथुआनिया आणि रोमानियामध्ये २० टक्क्यांहून कमी, तर फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड, स्विडन आणि ब्रिटनमध्ये ८० टक्क्यांहून अधिक प्रकरणे समलैंगिक पुरुषांची होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या समलैंगिक पुरुषांना एड्स होण्याची भीती वाटत नाही, त्यांच्यातच ‘सिफिलिस’चे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. तथापि, या धोकादायक आजारापासून मुक्ती कशी मिळेल, यावरही बरेच संशोधन सुरू आहे. विशेषज्ज्ञांच्या मते, वेगाने पसरणार्‍या या आजारापासून दूर राहण्याचा सद्यस्थितीतील सर्वात सुरक्षित उपाय निरोधचा वापर करणे, हाच आहे. दरम्यान, भारतासह जगभरात संकुचित मानसिकता, संस्कार वा संस्कृतीचा दबाव, प्रथा-परंपरेच्या बेड्या आदी कारणांमुळे सुरक्षित वा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संबंधांवर मोकळेपणाने चर्चाच होत नाही आणि त्यात पाश्चिमात्त्य देशदेखील मागेच आहेत. विशेषज्ज्ञांच्या मते, एड्सपीडितांना जागरुक केले पाहिजे आणि सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले गेले तर येत्या ५० वर्षांतच एड्स व तत्सम आजारांवर संपूर्ण नियंत्रण मिळवता येऊ शकते.

@@AUTHORINFO_V1@@