'रेफरेंडम-२०२०'

    15-Oct-2019   
Total Views | 54



अमेरिकेतील 'रेफरेंडम-२०२०' मोहिमेलाही पाकिस्तानचेच समर्थन असून त्या देशाच्या इशाऱ्यावरच मूठभर लोक भारतात पुन्हा एकदा दहशतीचे थैमान घालू इच्छितात. शृंगला यांनी असे करणाऱ्या खलिस्तानसमर्थकांना 'पाकिस्तानी एजंट' म्हटले असून 'रेफरेंडम-२०२०' हा एक बोगस मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले.


प्राचीन काळापासूनच समृद्ध आणि वैभवशाली भरतखंडाला परकीय आक्रमकांनी शतखंडित करण्याचे प्रयास केले. मध्ययुगातही धर्मांध टोळ्यांनी हाच उद्योग करत भारतावर युद्धे लादली. हजारो वर्षांपासून भारताचाच भाग असलेले अफगाणिस्तान, तिबेट, ब्रह्मदेश, श्रीलंका, बाली-जावा-सुमात्रा वगैरे प्रदेश नंतरच्या काळात एक एक करत मुख्य भूमीपासून सुटे होत गेले. मागच्या १०० वर्षांतील भारत-पाकिस्तान फाळणीचा रक्तरंजित घटनाक्रम हा त्याच मालिकेतला पुढचा टप्पा. त्यानंतर नव्याने जन्माला आलेला पाकिस्तानही भारताला तुकड्या-तुकड्यात वाटण्यासाठी कामाला लागला. कधी काश्मीर प्रश्नावरून तर कधी मुस्लिमांच्या मुद्द्यावरून तर कधी बांगलादेशमुक्तीच्या मानहानीतून त्याने भारताला विद्ध करण्याचे उद्योग आरंभले. समोरासमोरच्या युद्धात भारताने त्या देशाला मात दिल्याने नव्वदच्या दशकापासून तर पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग पत्करला. गेल्या २५-३० वर्षांत कसेही करून भारताचे लचके तोडायचे, अराजक माजवायचे, शांततेला चूड लावायची, या इराद्याने पाकिस्तानने जिहाद्यांना-फिदायिन हल्लेखोरांना प्रशिक्षण दिले, बॉम्बस्फोट घडवले. पण, हे एकाएकी झालेले नाही तर त्याला भारतातल्याच पाकप्रेमींनी किंवा स्लीपर सेल्सनीही सहकार्य केले. अजूनही पाकिस्तानची बाजू घेणारे, त्या देशाला दोषमुक्त करणारे इथे कितीतरी लोक सापडतील. हे सर्वच भारतात राहून देशाशीच गद्दारी करणारे लोक. आताही असाच एक मुद्दा समोर आला असून त्यात पाकिस्तानचा हात तर आहेच, पण स्वतःला 'भारतीय' म्हणवणारेही त्यात सहभागी आहेत.

 

इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना भारतापासून फुटून निघणाऱ्या पंजाबातील काही लोकांनी खलिस्तानवादी भूमिका घेतली. नंतर विघटनवादी शक्तींवर प्रहार करून भारतीय सुरक्षा बलांनी त्यांना आसमान दाखवलेच, पण त्यात इंदिरा गांधींचा दुर्दैवी मृत्यूही झालाच. खलिस्तान व त्यासंबंधित घटनांना आता बराच अवधी उलटून गेला-खलिस्तान समर्थकही संपले. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा खलिस्तानी भुताने डोके वर काढण्याचे काम चालवल्याचे दिसते. हे उद्योग इतके दिवस कॅनडामधून चालत होते, ते आता अमेरिकेतही सुरू झाले आहेत. खलिस्तान समर्थकांनी अमेरिकेत 'रेफरन्डम-२०२०' नावाने मोहीम सुरू केली आहे. तथापि, खलिस्तानचे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्याचा धंदा उघडलेली ही सर्वच मंडळी मूठभर असून त्यांना शीख समुदायाचे समर्थन अजिबातच नाही. उलट 'रेफरेंडम-२०२०'च्या नावाखाली चळवळ करणाऱ्या वळवळ्यांचा उद्देश अमेरिकेला भ्रमित करण्याचा आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी हे मत व्यक्त केले असून त्यांनी या सगळ्यामागे कोणाचा हात आहे, तेही सांगून टाकले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे जे फुटीरतेचे विषय कालवले, तेच आता पंजाबमध्ये खलिस्तानच्या नावाखाली करण्यासाठी तो देश सक्रिय झाला आहे.

 

अमेरिकेतील 'रेफरेंडम-२०२०' मोहिमेलाही पाकिस्तानचेच समर्थन असून त्या देशाच्या इशाऱ्यावरच मूठभर लोक भारतात पुन्हा एकदा दहशतीचे थैमान घालू इच्छितात. शृंगला यांनी असे करणाऱ्या खलिस्तानसमर्थकांना 'पाकिस्तानी एजंट' म्हटले असून 'रेफरेंडम-२०२०' हा एक बोगस मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले. तसेच हताशेने-निराशेने ग्रासलेली ही मंडळी कितीही वेडीवाकडी कृत्ये करण्याच्या प्रयत्नात असली तरी नव्या भारतात त्यांना स्थान नाही. लवकरच हे सगळेच लोक इतिहासजमा होऊन जातील, त्यांचे नावही कोणाच्या स्मरणात राहणार नाही. उल्लेखनीय म्हणजे, भारताच्या वरिष्ठ राजनयिक अधिकाऱ्याने पहिल्यांदाच 'रेफरेंडम-२०२०' विरोधात अशाप्रकारे मतप्रदर्शन केले आहे. दरम्यान, मोदी सरकार शीख समुदायाच्या बरोबरीने काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. तसेच गुरूनानक यांच्या ५५०व्या जयंती वर्षानिमित्त अमेरिकेतील भारतीय दूतावासात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, खलिस्तानवाद्यांना भारतातून पाठिंबा मिळत नाहीच, त्यांना पंजाबातून उडवून लावले जाते. परंतु, काश्मीरमध्ये आपली डाळ शिजणार नाही, याची खात्री पटल्याने पाकिस्तानने खलिस्तानवाद्यांना हाताशी धरण्याचे काम चालवल्याचे मात्र यातून दिसते. तसेच कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी याचा प्रत्ययही यातून येतो.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121