आरे वसाहतीतील 'मेट्रो-३' कारशेडसाठीच्या वृक्षतोडीचा वाद सध्या चांगलाच रंगला आहे. अशातच आता या ठिकाणी प्राणिसंग्रहालय उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. जुलै महिन्यात राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात प्राणिसंग्रहालयाबाबत करार झाला होता. याअंतर्गत पालिकेला आरेमधील १०० एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. ९९ वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया भाडेतत्त्वावर ही जागा हस्तांतरित केली आहे. या जागेभोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीला नुकतीच मंजूरी देण्यात आली. तसा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये आरेत नियोजित असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणिसंग्रहालयासाठी भिंत बांधण्यास १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
आरेमध्ये प्राणिसंग्रहालयाकरिता नियोजित करण्यात आलेली १०० एकर जागा ही 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे तुळशी वनपरिक्षेत्र आणि मरोळच्या हद्दीला लागून आहे. या दोन्ही हद्दींवर भिंत बांधण्यासाठी आर्थिक निधी मंजूर झाल्याने प्राणिसंग्रहालयाच्या जागेला संरक्षण प्राप्त होणार आहे. प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयामध्ये गोरेगाव आरे वसाहत, मुंबई येथे आंतराष्ट्रीय स्तराच्या प्राणी संग्रहालयाची स्थापना या लेखाशिर्षांतर्गत रुपये १ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरे मधील १९० एकर राखीव जागेपैकी १०० एकर जागेवर प्राणिसंग्रहालय बांधण्यात येणार असून या जागेभोवती भिंत उभारण्यास १ कोटी रुपयांच्या निधीला नुकतीच मंजूरी मिळाल्याची माहिती वन विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. ही भिंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येणार असली, तरी नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) यांच्याकडे हा निधी सुपुर्द करण्यात येणार आहे. शिवाय त्यांच्यामार्फत या कामावर नियंत्रण राहणार आहे. मात्र, ही भिंत उभारण्यासाठी काही झाडे तोडावी लागणार असल्याची शक्यता आहे.
Waqf Amendment Bill वरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न..