'पिंक गुलाबी स्काय' हे गाणे ठेका धरायला भाग पाडेल

    01-Oct-2019
Total Views | 50


 

'द स्काय इस पिंक' चित्रपटातील 'पिंक गुलाबी स्काय' हे नवीन गाणे आज प्रदर्शित झाले. एकदम उडत्या चाळीचे असलेले हे गाणे तुम्हाला देखील ठेका धरायला भाग पडेल असेच आहे. शाश्वत सिंह आणि जॉनीता गांधी यांनी या गाण्यासाठी पार्श्वगायन केले आहे. प्रीतम या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध संगीतकाराने या गाण्यालाच नाही तर चित्रपटातील अन्य गाण्यांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तर गाण्याला गुलझार यांच्या शब्दाची एक अप्रतिम जोड मिळाली आहे. त्यामुळे गाण्याला आणखीनच रंगात चढली आहे असे वाटते.

प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वासिम, रोहित सराफ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. त्यांच्याचवर चित्रित या गाण्यावर सगळ्यांनीच डान्स केला आहे. या चित्रपटातील आपल्या आवडीचा ट्रॅक आहे असे म्हणत तसेच हे एक हॅपी सोंग आहे असे गाण्याचे कौतुक करत प्रियांका चोप्राने 'पिंक गुलाबी स्काय' हे नवीन गाणे सोशल मिडीआयवर नुकतेच शेअर केले. ज्याला हळूहळू प्रेक्षकांचा प्रतिसाद यायला देखील सुरुवात झाली आहे.

शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इस पिंक' हा फॅमिली ड्रामा ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास आता सज्ज झाला आहे. त्यापूर्वी आज प्रदर्शित झालेल्या या गाण्यामुळे आता प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121