उशिरा आल्यावरही परिक्षा देता येणार : मुंबई विद्यापीठ

    08-Jan-2019
Total Views | 18

 

 
 
 
 
 
 
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात पोहोचण्यास उशिर झाला तरी त्यांना परिक्षेला बसू द्यावे. अशी सूचना मुंबई विद्यापीठाने सर्व परिक्षा केंद्रांना दिली आहे. सध्या मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अशावेळी विद्यार्थांना परिक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर होऊ शकतो. परिक्षा केंद्राचे प्रमुख आणि प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना उशीरा आले तरी परिक्षेला बसू द्यावे अशी सूचना मुंबई विद्यापीठाने दिली.
 
 

 
 

बेस्ट संपाच्या काळात विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष देत मुंबई विद्यापीठाने ही सूचना परिक्षा केंद्रांना दिली. महाविद्यालयांनाही मुंबई विद्यापीठाने ही सूचना दिली आहे. अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या वतीने जनसंपर्क प्रमुख विनोद मळाळे यांनी दिली. सध्या मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रात १७ परिक्षा सुरु आहेत. यामद्ये एलएलबी, एमएस्सी, एमकॉम, एमए, बीएड, एमपीएड, बीपीएड, (बीएड स्पेशल एज्युकेशन) एमएड या परिक्षांचा यात समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..