सुप्रजा आयुर्वेदीय दृष्टिकोन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



प्रसूतीनंतर मातृत्व हे आयुष्यभर राहते आणि जे संस्कार, बदल घडवायचे आहेत, त्याची सुरुवात या गर्भिणी अवस्थेत करायची असते. पण, प्रयत्न (चांगले घडविण्यासाठी) हे आयुष्यभर सुरू ठेवावे लागतात आणि ही गर्भिणी अवस्था (स्त्रीसाठी) व गर्भावस्था (बाळासाठी) उत्तम राहण्यासाठीचे काही बदल हे गर्भधारणेपूर्वी करणे गरजेचे आहे. म्हणूनच स्त्री शरीराची गर्भधारणेपूर्वी शुद्धी का व कशी करावी, याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊया.


मागील दोन भागांमधून सुप्रजेबद्दल माहिती घेत आहोत. काळाची गरज पाहता, बहुतांशी दाम्पत्यांना एक किंवा फार फार तर दोन अपत्ये असतात. (याला काही अपवाद आहेत.) ‘चुकून’ दिवस राहिले असे हल्ली फार कमी होते. ‘आई’ कधी व्हायचे, याबद्दल विचार करून मगच निर्णय होतो आणि त्याप्रमाणे पाऊल उचलले जाते. अशा ‘planned Conception’ चे प्रमाण खूप वाढले आहे. पण, हे नियोजन फक्त अपत्य कधी होऊ द्यायचे, एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. उत्तम संततीसाठीही काही करता येते, याबद्दल खूप अज्ञान आहे. उत्तम संततीसाठी काही शरीर शोधन (शुद्धी) क्रिया दाम्पत्याने गर्भधारणा होण्यापूर्वी करणे गरजेचे आहे. शरीर शुद्ध आणि निरोगी, मन उत्साही आणि गर्भधारणेची इच्छा असल्यास गर्भाधारणा लवकर होते आणि गर्भिणी अवस्था विनाकष्ट पार पडतेएक कानमंत्र सर्व दाम्पत्यांनी मात्र कायम लक्षात ठेवावा. गर्भिणी अवस्था ही फक्त नऊ महिने आणि काही दिवसांची असते. पण, जे अपत्य जन्माला येते, त्याचे संपूर्ण भविष्य या नऊ महिन्यांवर अवलंबून असते. स्त्रीदेखील नऊ महिन्यांसाठी गर्भिणी असते, पण प्रसूतीनंतर मातृत्व हे आयुष्यभर राहते आणि जे संस्कार, बदल घडवायचे आहेत, त्याची सुरुवात या गर्भिणी अवस्थेत करायची असते. पण, प्रयत्न (चांगले घडविण्यासाठी) हे आयुष्यभर सुरू ठेवावे लागतात आणि ही गर्भिणी अवस्था (स्त्रीसाठी) व गर्भावस्था (बाळासाठी) उत्तम राहण्यासाठीचे काही बदल हे pre-conception (गर्भधारणेपूर्वी) पासून करणे गरजेचे आहे.

 
स्त्री शरीराची गर्भधारणेपूर्वी शुद्धी का व कशी करावी, याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊयात. स्त्री शरीरात वेगवेगळे बदल घडत असतात. वयात येण्यापूर्वी (Menarche सुरू होण्यापूर्वी) स्त्री शरीर व पुरुष शरीर यांची वाढ साधारणपणे सारखीच होत असते. पण, ऋतुप्राप्तीनंतर स्त्री शरीरात विशिष्ट बदल घडतात. स्त्री शरीर हे ‘जनन’ प्रक्रियेसाठी सक्षम होण्यास तयार होऊ लागते. वयाच्या १०-१३ व्या वर्षी हल्ली मासिक पाळी सुरू होते. यानंतर गर्भाशयाचे कार्य सुरू होते. हे जरी सुरू होत असले तरी वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत शरीर संपूर्णरित्या सक्षम झालेले नसते. त्यामुळे १८ वर्षांपूर्वी गर्भधारणा राहू नये. पहिल्या भागात मासिक पाळीबद्दल सविस्तर वर्णन केले आहे. मासिक स्राव हा नियमित कालावधीने (२८ ते ३५ दिवसांनी), ठराविक काळापुरता (३ ते ५ दिवस) आणि मर्यादित स्वरूपाचा योनीद्वारे होणारा रक्तस्राव असतो. हा स्राव गर्भाशयातून होतो आणि योनीद्वारे बाहेर पडतो. ही शरीराची स्वाभाविकरित्या होणारी शरीर शुद्धी आहे. हे नियमित चक्र अव्याहतपणे वयाच्या ४५-५०व्या वर्षापर्यंत सुरू असते. केवळ गर्भिणी असताना व प्रसृती झाल्यावर दोन-सहा महिने रज:प्रवृत्ती थांबते; अन्यथा हे चक्र नियमित असते. गर्भधारणा होण्यासाठी सर्वात मुख्य नियमित रज:प्रवृत्ती (Menstrual Cycle) असणे गरजेचे आहे. काही विशिष्ट आजारांमध्ये व काही Hormonal Conditions मध्ये ही नियमितता राहत नाही. गर्भधारणेसाठी त्यांची चिकित्सा करून घेणे आवश्यक असते. मासिक स्रावाच्या वेळेस जननक्षम अवयवांवर अतिताण असतो. त्यांना (व पर्यायाने शरीराला) विश्रांतीची गरज असते. अति तणावयुक्त वातावरण नसावे. तसेच अति शारीरिक कष्ट व अंगमेहनतही टाळावी. असे बघण्यात येते की, जर शारीरिक/मानसिक ताण अधिक असला तर रज:स्त्राव अधिक काळ व अधिक प्रमाणात होतो. शरीर-मन थकते, अशक्त होऊ शकते. हा रोग नाही, त्यामुळे संपूर्ण विश्रांतीची अपेक्षा नाही. पण, अधिक दगदग-धावपळ टाळावी. शरीराला विश्रांती द्यावी, पण नित्य कामे करावीत. अन्न हे पचायलाच हलके व पचनशक्ती उत्तम राखण्यास उपयोगी असेल, असे असावे. म्हणजे भाताची पेज (जुन्या तांदळाची पेज) मुगाच्या डाळीची पातळ खिचडी, विविध भाज्यांचे सूप, दूध, खीर, फळ इ. दूध आणि तूप घ्यावे. याने अग्नि उत्तम राहतो आणि शरीरातही ताकद टिकण्यास मदत होते. अति तिखट-चमचमीत मसालेदार खाल्ले, तर मासिक स्रावात होणारा रक्तस्राव अधिक मात्रेत होतो आणि अधिक काळ रजःस्राव होत राहतो. तसेच शिळे, कुजके,आंबवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले तर मासिक स्रावाच्या वेळेस पोटदुखी, कंबरदुखी, पोटऱ्या दुखणे इत्यादीचे प्रमाण वाढते. मासिक स्राव कष्टमय होतो. अतिखारटही टाळावे. प्रक्रिया न केलेले अन्न आणि फळे खावीत. सात्विक आहार-विहार आणि आचार असावा. मासिक स्रावानंतर दहावा वा ते अठरावा दिवस हा Ovulation Period धरला जातो. या दिवसांमध्ये समागम केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. पण, यासाठी नियमित मासिक रजःप्रवृत्ती असणे महत्त्वाचे आहे. 
 

गर्भधारणेपूर्वी स्त्री शरीराची शुद्धीक्रिया ही मासिक स्राव थांबल्यानंतर करावी. अवस्थेनुरूप शरीरशुद्धीसाठी बस्ती (निरूह, अनुवासन, मात्रा इ.) उत्तर बस्ती आयोजिली जाते. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच वरील पंचकर्म करून घ्यावीत. ऋतुनुरूप वैद्यांच्या सल्ल्याने वमन करून मग विरेचन आणि त्यानंतर बस्ती असा उपक्रम असावा. तिशीनंतर सुखकर गर्भधारणा गर्भावस्था पूर्ती आणि सुखकर प्रसूतीसाठी स्नायूंमधील लवचिकता टिकवणे गरजेचे आहे. यासाठी शरीराला अभ्यंग आणि योनीमुखाशी पिचुधारण हे करावे. कंबर व Hip Grdle Flexible (लवचिक) राहावा म्हणून स्नेहन-स्वेदन, मात्रा बस्ती इ. गरजेनुरूप वैद्यांच्या सल्ल्याने करून घ्यावे. ७-१४-२१ या मात्रेत वरील उपक्रम करून घ्यावे लागतात. वरील उपक्रम गर्भधारणेपूर्वी तीन महिने सुरू करावे. नंतर गर्भधारणा योजावीशारीरिक तयारीबरोबरच मानसिक तयारी होणेही गरजेचे आहे. Acceptance महत्त्वाचा आहे. गर्भ राहिल्यापासून जशी स्वतःची व ओघाने गर्भाची काळजी घेतजी जाते, त्याचप्रमाणे बाळ वर्षाचे होईपर्यंत तरी किमान त्याची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी जन्मानंतर सहा महिन्यापर्यंत फक्त स्तनपानावर बाळाची वाढ होणे अपेक्षित आहे. शरीरामध्ये स्तन्य निर्मितीची क्षमता केवळ प्रसूतावस्थेतच असते, पण त्याचीही पूर्वतयारी आवश्यक आहे. माता होण्याचा मनात विचार आल्यापासून ते स्तनपान सुरू असेपर्यंत तरी स्तन्य उत्पत्ती, निर्मितीसाठी दूध पिणे गरजेचे आहे. जसे कॅल्शियमसाठी दुधाची गरज असते, तसेच स्तन्यनिर्मितीसाठीही दूध गरजेचे आहे. म्हणून गर्भिणी अवस्थेत व प्रसूतीनंतर विविध प्रकारच्या खिरी व लाडू, शिरा इ. खाण्यास दिले जाते. हे सर्व शास्त्रीय आहे, गावठी नाही. या गोष्टींचा अवलंब अवश्य करावा. या आहाराबद्दल पुढील लेखात विस्तृत सांगेन. मानसिक तयारी म्हणजे सकारात्मक वातावरण. घरामध्ये, विविध नात्यांमध्ये प्रेम-जिव्हाळा असणे महत्त्वाचे आहे. धकाधकीचे आणि तणावपूर्ण वातावरणात नवनिर्मितीला बाधा उत्पन्न होते. उभयतांमध्ये प्रेम, माया तर हवीच, पण त्याबरोबरच क्षमाशीलताही हवी. मतभेद होणार, पण ते स्वीकारणे गरजेचे असते. वातावरण शांत, समाधानी असावे. निर्मळ, प्रसन्न वातावरणात समस्या सोडविणे सोपे होते. हल्ली काही दाम्पत्यांना ऋतुकाळी (Ovulatory Period) मध्ये सुट्टी घेऊन बाहेरगावी जाण्याचा सल्ला दिला जातो, तो याच कारणासाठी. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, धावपळीमध्ये एकत्र बसून बोलणेही कठीण झाले आहे, तर समागमाचा विषयच नको. यासाठी एकत्र विचार करून ध्येयाच्या दिशेने उभयतांना पावले उचलणे गरजेचे आहे. पुढील लेखमालेत पुरुष शरीरासाठीच्या शुद्धीक्रिया जाणून घेऊयात...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@