मुंबई : नववर्षाच्या निमित्ताने चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना केवळ १०१ रुपये देऊन विवोचा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. ‘न्यू फोन, न्यू यू.’ असे या ऑफरचे नाव असून विवो V११ विवो V११ प्रो आणि विवो Y९५ या स्मार्टफोनसाठी ही ऑफर लागू असणार आहे. या ऑफरनुसार तुम्ही १०१ रुपयांचे डाऊनपेमेंट भरून ६ महिन्याच्या सुलभ हफ्त्याने विवोचा स्मार्टफोन खरेदी करु शकणार आहात.
#NewPhoneNewYou This New year, get your favorite Vivo Nex, V or Y series device at just INR 101.
— vivo India (@Vivo_India) January 3, 2019
Know more: https://t.co/wzYDFH67Bg pic.twitter.com/J6utLotwJX
३१ जानेवारीपर्यंत या ऑफरचा कालावधी मर्यादित असून १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक दर असलेल्या स्मार्टफोनची खरेदी या माध्यमातून करु शकता. यासोबतच या स्मार्टफोनच्या खरेदीवर कॅशबॅकदेखील मिळणार आहे.मात्र, ही ऑफर केवळ विवो स्टोअरमधेच उपलब्ध असणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/