एटीएसने अटक केलेल्या नऊ जणांच्या आयसिसशी संबंध

    23-Jan-2019
Total Views | 84


 
 

मुंबई : मुंब्रा आणि औरंगाबादूहन एटीएसने अटक केलेले नऊ संशयितांना इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर संबंधितांना मुंबई एटीएसच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

 

एनआयए आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईत एटीएसच्या पथकाने संशयितांची तब्बल आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर ठाणे एटीएसने त्यांना मुंबई एटीएसच्या ताब्यात दिले आहे. आता यापुढील तपास मुंबई एटीएस करणार असून ठाणे एटीएसने ठाण्यातील मुंब्रा परिसरातील कौसा भागात असलेल्या सागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मजहर शेख या तरुणाच्या घरात सोमवारी मध्यरात्री ३ वाजता छापा टाकत त्याला ताब्यात घेतले होते.

 

मजरफ याच्यासह इतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने कारवाईला सुरुवात केली आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांच्या स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मुंबई जवळच्या मुंब्रा आणि औरंगबाद या भागात एटीएसने कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यांचा संबंध इसिसशी असल्याचे बोलेले जात आहे. त्यांच्याकडून काही रसायने, पावडर, मोबाईल फोन, हार्ड ड्राईव्ह, सिम कार्ड, एसिड बॉटल, सुरे आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.


बंगळुरूमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या औरंगाबादच्या शाखेच्या संपर्कात असल्याची माहीती उघड झाली आहे. औरंगाबाद येथील शाखा सलमान नावाचा तरुण चालवत असून मुंब्रा येथील मोहम्मद मझहर शेख, मोहसीन खान, फहाद शाह या तिघांना ठाणे एटीएसने ताब्यात घेतले. तिन्ही तरुण उच्चशिक्षित आहेत. मोहम्मद मजहर शेख याच्या घरातून सर्व मोबाईल, कागदपत्र, लॅपटॉप ताब्यात घेतले. हे तिघे तरुण संबंधित संस्थेत जाऊन शिक्षा घेत असल्याचा एटीएसला संशय आहे. संबंधित संस्था देशविरोधी काम करत असल्याच्या संशयावरून या तिघांना मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आले. सलमानला औरंगाबादहून ताब्यात घेण्यात आले.


या प्रकरणी मुंबई एटीस पुढील तपास करत असून मझहर शेख यांच्या घरातील एकूण ६ मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ४ मोबाईल बंद अवस्थेत होते आणि इतर २ मोबाईल आई आणि भावाकडून ताब्यात घेतले असून २ सिमकार्ड आणि १ लॅपटॉपदेखील ताब्यात घेतले आहेत.

 

मझहर शेख हा ५ वेळचा नमाजी असून तो गेल्या ३ वर्षांपासून भाड्याने मुंब्रातील अलमास कॉलनी सागर अपार्टमेंटमध्ये आई, पत्नी आणि भावा बरॊबर राहत होता. मझहर शेख हा भिवंडी येथील एका इलेक्ट्रॉनिक फॅक्ट्रीमध्ये कामाला असल्याचेही त्याचा मोठ्या भावाने सांगितले आहे. पुढील तपास संयुक्तरित्या सुरू राहणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

मुंबई एटीएस आयसीस मुंब्रा पोलीस महाराष्ट्र पोलीस Mumbai ATS Icis Mumbra Police Maharashtra Police ATS arrested nine may connection with ISIS एटीएसने अटक केलेल्या नऊ जणांच्या आयसिसशी संबंध मुंबई : मुंब्रा आणि औरंगाबादूहन एटीएसने अटक केलेले नऊ संशयितांना इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर संबंधितांना मुंबई एटीएसच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशी सुरू आहे. एनआयए आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईत एटीएसच्या पथकाने संशयितांची तब्बल आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर ठाणे एटीएसने त्यांना मुंबई एटीएसच्या ताब्यात दिले आहे. आता यापुढील तपास मुंबई एटीएस करणार असून ठाणे एटीएसने ठाण्यातील मुंब्रा परिसरातील कौसा भागात असलेल्या सागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मजहर शेख या तरुणाच्या घरात सोमवारी मध्यरात्री ३ वाजता छापा टाकत त्याला ताब्यात घेतले होते. मजरफ याच्यासह इतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने कारवाईला सुरुवात केली आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांच्या स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मुंबई जवळच्या मुंब्रा आणि औरंगबाद या भागात एटीएसने कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यांचा संबंध इसिसशी असल्याचे बोलेले जात आहे. त्यांच्याकडून काही रसायने पावडर मोबाईल फोन हार्ड ड्राईव्ह सिम कार्ड एसिड बॉटल सुरे आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. बंगळुरूमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या औरंगाबादच्या शाखेच्या संपर्कात असल्याची माहीती उघड झाली आहे. औरंगाबाद येथील शाखा सलमान नावाचा तरुण चालवत असून मुंब्रा येथील मोहम्
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121