इतिहास समजून घेण्यासाठी तो मनात रूजविणे गरजेचे : आप्पा परब

    12-Jan-2019
Total Views | 29



टिटवाळा : ‘कोकण इतिहास परिषदेच्या ९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील जीवनदीप महाविद्यालयात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. यावेळी आपल्या परखड व स्पष्ट भाषणातूण आप्पा परब यांनी इतिहास समजून घेण्यासाठी तो मनात रूजविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच “इतिसासाची खोटी माहिती काही कवी आणि लेखक समाजाला देणायाचा प्रयत्न करताता त्यांनी खरा इतिहास समाजाला सांगावा. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनात आपण कोणत्या क्षेत्रात आहोत याचा विचार न करता इतिहासाचा अभ्यास केला तर नक्कीच ध्येय निश्चिंत करू शकतील,” असेही ते यावेळी म्हणाले.

 

या कार्यक्रमासाठी कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते, कल्याण उपविभागीय अधिकारी नितीन महाजन, टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. मंजिरी भालेराव (पुणे), ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आप्पा परब यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच या प्रसंगी छायाचित्रण स्पर्धा, माहितीपट सादरीकरणा व रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेल्या विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या अधिवेशनाप्रसंगी आप्पा परब यांच्या ‘शिक्के’ आणि ‘कट्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

 

इतिहासाच्या आधारे जाती व धर्म भेदाला वाव देऊन सध्याच्या परिस्थितीत वादाला तोंड फोडले जाते. इतिहास योग्य प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे. जर इतिहास व्यवस्थित समजला तर कुठल्याही प्रकारचा जाती आणि धर्मभेदाचा तिडाच निर्माण होणार नाही,” असे मत यावेळी मार्गदर्शनपर भाषणातून अधिवेशन अध्यक्षा डॉ. मंजिरी भालेराव यांनी व्यक्त केले. “इतिहास हा विषय आपल्या जिवनाला कलाटणी देणारा विषय आहे. परंतु सद्यस्थिती पाहता इतिहास हा विषय भूतकाळातच जमा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतिहासाची कास धरली तर तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी कधीच मागे पडणार नाहीत,” असे वक्तव्य यावेळी कल्याण उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांनी उपस्थित विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना उद्देशून केले.

 

ऐतिहासिक किल्ल्यांच्या माहितीपटांची मांदियाळी

 

अधिवेशनात ऐतिहासिक किल्ल्यांचे प्रदर्शन व माहिती पट दाखविण्यात आले. याचा लाभ कल्याण तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला. प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचिन इतिहासाची माहिती इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली दाखविण्यात आली. तसेच या यावेळी इतिहासाची माहिती व विविध गड किल्याचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
हार्वर्ड विद्यापीठातील वाढत्या इस्लामिक कट्टरतावादी हालचालींना ट्रम्प सरकारचा दणका!

हार्वर्ड विद्यापीठातील वाढत्या इस्लामिक कट्टरतावादी हालचालींना ट्रम्प सरकारचा दणका!

(Trump freezes $2bn in Harvard funding) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना चांगलेच धक्के बसले आहे. आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या निर्णयांबरोबरच देशाअंतर्गतही त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प यांनी आपला मोर्चा शिक्षणसंस्थाकडे वळवला आहे. जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाचे २.२ अब्ज डॉलर्सहून (सुमारे १८ हजार कोटी रुपये) अधिक शैक्षणिक निधी गोठवला आहे. विद्यापीठात सातत्याने..

आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या

आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!

झी स्टुडिओज् नेहमीच प्रेक्षकांना, मनोरंजक, दर्जेदार आशय असलेले चित्रपट देत आले आहेत. झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ मिळून आपल्यासाठी असाच एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत . सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिना दिवशी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेवर आधारित या प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. संधी ही कशी आणि केव्हा चालून येईल ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121