रोजावा क्रांतीतील हुतात्मे – १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018   
Total Views |

 


 
 
 
कुर्दांच्या या विजयामुळे जगाला कुर्द व पर्यायाने रोजावा क्रांतीची दखल घेणे भाग पडले. रोजावा क्रांतीमध्ये कुर्दांसोबत स्थानिक इतर वांशिक व धार्मिक लोकही सामील झाले होते. तसेच रोजावा बाहेरील काही योद्धे कुर्दांना साहाय्य देण्यासाठी या युद्धात सामील झाले होते. अशाच काही हुतात्म्यांची माहिती आपण जाणून घेऊया.
 
 

रोजावा क्रांतीच्या प्रयोगाकडे तसं म्हटंल तर जगाने दुर्लक्षच केलं, पण ‘इसिस’च्या अचानक उदयामुळे जग चिंताक्रांत झालेले असताना व त्यांच्याशी लढा देण्यास मोठमोठाले देश, महासत्ता कमी पडत असताना व कुर्दांना अत्यंत अल्पसंख्या, साधनांचा व शस्त्रास्त्रांचा तुटवडा भेडसावत असताना अस्तित्वाशी लढाई समजून ‘इसिस’ला कडवा विरोध केला, बघता बघता मोक्याच्या क्षणी बाह्य साहाय्य मिळून कुर्दांनी ‘इसिस’चा कोबानमध्ये पराभव केला. कुर्दांच्या या विजयामुळे जगाला कुर्द व पर्यायाने रोजावा क्रांतीची दखल घेणे भाग पडले. रोजावा क्रांतीमध्ये कुर्दांसोबत स्थानिक इतर वांशिक व धार्मिक लोकही सामील झाले होते. तसेच रोजावा बाहेरील काही योद्धे कुर्दांना साहाय्य देण्यासाठी या युद्धात सामील झाले होते. अशाच काही हुतात्म्यांची माहिती आपण जाणून घेऊया.

जेक क्लिप्स्च 

 

मूळ नाव: जेक क्लिप्स्च (Jake Klipsch)

 

युद्धातील टोपण नाव : डेलिल एमेरिका (Dell Emerka)

 

आईचे नाव : लिलियन (Lillian)

 

वडिलांचे नाव : डॅन (Dana)

 

जन्मदेश : अमेरिका

 

हुतात्मा दिन : ५ जानेवारी, २०१८

 

हुतात्मा स्थळः आयन इस्सा (ayn Issa)

 

रोजावामध्ये ‘इसिस’ने कोबानवर जोरदार हल्ला करून वेढा घातला होता व तेथे जोरदार धुमश्चक्री चालू होती. २०१६ च्या सुरुवातीला जेक क्लिप्स्च हा अमेरिकेत जन्मलेला लढाऊ योद्धा रोजावामध्ये कुर्दांना साहाय्य करण्यासाठी दाखल झाला. दाखल झाल्यावर त्याला थेट युद्धात उतरवणे धोकादायक व मूर्खपणा ठरला असता, त्यामुळे आधी दोन महिने त्याला सैनिकी आणि वैचारिक-सैद्धांतिक प्रशिक्षण दिले गेले. त्याच्यासोबत इतरही रोजावाला साहाय्य करण्यासाठी दाखल झालेल्या आंतरराष्ट्रीय लढाऊ योद्धांना प्रशिक्षण दिले जात होते. इसिस व इतर दहशतवादी तसेच रोजावा शत्रूंशी लढण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जात होतेजेक क्लिप्स्चला डेलिल एमेरिका (Dell Emerka) हे युद्धातील टोपण नाव मिळाले. सैनिकी आणि वैचारिक-सैद्धांतिक प्रशिक्षण पूर्ण केल्यावर जेक क्लिप्स्चला सर्वात आधी शद्दादी मोहिमेवर पाठवण्यात आले. मग मान्बिज मोहिमेवर. येथे ‘इसिस’शी लढण्याची संधी मिळाली. मान्बिज मुक्त होऊन विजय मिळेपर्यंत जेक क्लिप्स्च तेथे होता व त्यांनी त्याला दिलेले दायित्व उत्तमरित्या पार पाडले. त्यानंतर त्याला रक्का शहराच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. रक्का शहराच्या मुक्ततेही त्याने चोख कामगिरी बजावली. शस्त्रांची साफसफाई करत असताना अपघात होऊन दुर्दैवाने त्यात त्याचा मृत्यू झाला.

 

ऑलिव्र हॉल

मूळ नाव : ऑलिव्र हॉल (Olivr Hall)

 

युद्धातील टोपण नाव: कॅन्झेर झॅग्रोस (Canser Zagros)

 

आईचे नाव : जेन (Jane)

 

वडिलांचे नाव : कॉलिन

 

जन्मदेश : गॉसपोर्ट, युके

 

जन्मवर्ष : १९९३

 

हुतात्मा दिन : २५ नोव्हेंबर, २०१७

 

हुतात्मा स्थळ : रक्का

 

रक्का मोहीम सुरू असताना मूळच्या गॉसपोर्ट, युकेमधील ऑलिव्र हॉल People’s Defense Units म्हणजे वायपीजीमध्ये सामील झाला. युद्धात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या त्याने यशस्वीरित्या हाताळल्या. रक्का शहराच्या मुक्ततेनंतर रक्कावासी आपल्या घरी परतू लागले. पण, शहरातील जवळजवळ प्रत्येक इमारतीत ‘इसिस’ने सापळे व सुरूंग पेरून ठेवले होते, जेणेकरून शहर जरी आपल्या हातून सुटले तरी स्थानिक आपल्या घरी येताच सुरूंग स्फोटाने मृत्युमुखी पडतील आणि शत्रूची हानी होऊन अनागोंदी माजेल व या अनागोंदीचा फायदा घेऊन आपण परत शहरात प्रवेश करू शकू, असा ‘इसिस’चा हेतू होता. पण, वायपीजीला याची माहिती मिळताच त्यांनी या सापळे व सुरूंगाचा शोध घेऊन ते निकामी करण्याची मोहीम हाती घेतली. ही मोहीम खूप दक्षता घेऊन अतिशय काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक होते, तरच शहरवासी सुखरूप आपल्या निवासस्थानी परतून राहू शकले असते. दि. २५ नोव्हेंबर, २०१७ ला ‘कॅन्झेर झॅग्रोस’ हे युद्धातील टोपण नाव मिळालेला ऑलिव्र हॉल एक booby-trap नादुरुस्त करत असताना त्याला वयाच्या २४ व्या वर्षी हौतात्म आले.

 

मेहमेत अक्सोय

 

मूळ नाव : मेहमेत अक्सोय (Mehmet Aksoy)

 

युद्धातील टोपण नाव : फिराझ डॅग (Fraz Da)

 

आईचे नाव : झेयनेप (Zeynep)

 

वडिलांचे नाव : कॅलेंदेर (Kalender)

 

जन्मदेश : मलात्या

 

जन्मवर्ष : १९८५

 

हुतात्मा दिन : २६ सप्टेंबर, २०१८

 

हुतात्मा स्थळ : रक्का

 

मेहमेत अक्सोयचा जन्म उत्तर कुर्दिस्तानच्या एल्बिस्तान जिल्ह्यातील मरास परगण्यात झाला. नंतर मेहमेतचे पालक युरोपात स्थायिक झाल्यामुळे लंडनमध्ये बालपण गेले. मेहमेतने चित्रपट निर्मिती क्षेत्रात विद्यापीठीय शिक्षण पूर्ण केले होते. बऱ्याच साहित्यिक संघटनेत त्याचा सहभाग होता. तरुणपणापासून भांडवल विरोधी विचारप्रणाली, लोकशाहीवादी व मानवाधिकार अधिकार यांच्याकडे त्याचा ओढा होता. ३ ऑगस्ट, २०१४ ला झालेल्या शेंगाल हत्याकांडानंतर त्याने कुर्द संघटनेमध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केलीकुर्द व इतर वांशिक गटांच्या समस्या व प्रश्नांचे परीक्षण करून जगापुढे मांडण्याऱ्या ‘Kurdish Question’ चा तो संस्थापक आणि प्रमुख संपादक होता. या माध्यमातून त्याने कुर्द प्रश्न, रोजावा क्रांती व महिलांचा लढा या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडल्या. मेहमेत अक्सोय म्हणायचा की, “आपल्याला दडपून ठेवणारी व्यवस्था जागतिक आहे. आपल्याला दडपून ठेवणाऱ्या व्यवस्थेत एकमेकांत ऐक्य आणि एकता आहे. त्यामुळे आपल्या दडपणाऱ्या याच व्यवस्थेविरुद्ध आपण एकोप्याने राहिले पाहिजे.” त्याने दडपलेल्या व अत्याचारग्रस्त देशांच्या संघटनेचे आवाहन केले होते.

 

‘इसिस’ने २०१४ मध्ये कोबानवर केलेल्या हल्ल्यानंतर मेहमेत अक्सोयने लंडनमध्ये रस्त्यावर व रेल्वे स्थानकांवर कुर्दिशांची निदर्शनं घडवून आणली होती. वायपीजे व रोजावाच्या मुक्त महिला या मध्य आशियासाठी आदर्श व मार्गदर्शक आहेत असे तो म्हणत असे. तो रोजावा क्रांतीतील महिला सबलीकरणाने व महिलांच्या लढाऊ वृत्तीमुळे प्रभावित झाला होता‘इसिस’ विरोधातील आपल्या कुर्द बांधवांचा लढा प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो रक्का मोहीम व देर इझ्झोर प्रांतामधील कारवाईत सहभागी झाला. प्रत्येक हालचाल, झटापट, हल्ला, विरोध, आक्रमण यांची तो बारकाईने नोंद ठेवत होता. २६ सप्टेंबर, २०१८ च्या सकाळी रक्कामध्ये कर्तव्य बजावत असताना ‘इसिस’च्या हल्ल्यात मेहमेत अक्सोय हुतात्मा झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@