व्यवसायजन्य आजार आणि त्यावरील उपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
व्यवसाय - वाहतूक पोलीस
 

गणेशोत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. सार्वजनिक गणपती वाजत-गाजत आपल्या स्थानी पोहोचलेत आणि सुंदर देखावे बघण्यासाठी, गणपतीबाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी यंदाही दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने गर्दी केली. पण, मागील ११ दिवस हे सगळं सुरळीत घडवून आणण्यासाठी दोन व्यावसायिकांचे संपूर्ण बळ (Man Force) कार्यान्वित आहे. एक म्हणजे पोलीस आणि दुसरे वाहतूक (Traffic) पोलीस. आजच्या लेखमालेतून वाहतूक पोलिसांना होणारे व्यवसायजन्य आजार व ते होऊ नयेत म्हणूनचे प्रतिबंधात्मक उपाय आणि आजार झाल्यास त्यावरचे उपचार याबद्दल जाणून घेऊया. आजारांबद्दल जाणण्यापूर्वी वाहतूक पोलिसांची दिनचर्या (Routine) जाणून घेणे गरजेचे आहे.

 

वाहतूक पोलिसांची नोकरी म्हणजे सरकारी नोकरी. त्यामुळे मोठ्या संख्येने युवापिढी या नोकरीकडे वळते. यासाठी शारीरिक आणि बौद्धिक चाचणी होते आणि मगच त्यांची निवड होते. खूप उत्साहाने युवावर्ग मग वाहतूक पोलीस म्हणून निवडून आल्यावर कामावर रुजू होतो. वाहतूक पोलिसांचे काम हे मुख्यत्वे करून उभ्याने असते. विविध दिशांनी येणाऱ्या गाड्यांना नियमबद्ध मार्गाने जाण्यास दिग्दर्शित करणे हे काम अहोरात्र सुरू असते. यात बंदोबस्त, बंद, सणांचे दिवस, मोर्चे, VIP गाड्या, रुग्णवाहिका, रास्ता रोको, आंदोलने इ. वेळेस अतिदक्षतापूर्वक काम करावे लागते. काही रस्त्यांच्या डागडुजींमुळे पावासापाण्यात कोसळलेल्या पूल-इमारतींमुळे मार्ग बदलायला लागतो आणि अन्य रस्त्यांवर वाहतूक गर्दी वाढते. तिचेही व्यवस्थित नियमन करावे लागते. वाढत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे कितीही मोठे रस्ते असले तरी, वाहतूककोंडी होतेच आणि अशातच संतप्त जमावाला नियंत्रीत ठेवावे लागते. सध्या, road rage incidents चे प्रमाण खूप वाढले आहे. या सर्व गोष्टींमुळे वाहतूक पोलिसांना पुढील प्रकारे शारीरिक व मानसिक तक्रारी उद्भवू शकतात.

 
खूप काळ एका जागी उभे राहून काम करावे लागते. (Long standing hours in static position) यामुळे संपूर्ण शरीराच्या वजनाचा भार पायावर येतो. यामुळे सुरुवातीला पायदुखी सुरू होते. पाय भरून येणे, पोटऱ्या दुखणे, वजन खूप असल्यास पाय सुजणे या तक्रारी सुरू होतात. हळूहळू कंबर आणि त्या भोवती दुखू लागते. जखडल्यासारखे होते. क्वचित प्रसंगी पायातील शिरांमधील रक्तसंचार नीट होत नसल्याचे varicose veins, ज्यात या शिरा ताठरतात, फुगतात- उत्पन्न होतात. हे त्रास होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय अवलंबावेत. दोन्ही पायांवर भार सारखाच येईल असे उभे राहावे. ताठ उभे राहावे, पोक काढू नये. स्नायुंची क्षमता वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी नियमित व्यायामाची अत्यंत गरज असते. स्नायुंची क्षमता, शरीराची लवचिकता आणि साध्यांची बळकटी हवी असल्यास अभ्यंगाला तोड नाही. रोज उठल्यावर आंघोळीपूर्वी आणि रात्री झोपताना कंबर, पाय आणि अन्य सांध्यांना तेल लावावे व हलक्या हाताने चोळावे. मध्ये-मध्ये पायाचे stretching and relaxing exercises उभ्यानेच करावेत. अतिकाळ उभं राहिल्याने सांध्यांची आणि हाडांची (Musculoskeletal problems) दुखणी उद्भवतात. ती टाळण्यासाठी उपरोक्त गोष्टी अवलंबाव्यात. पायात मोजे असल्यास ते पोटरीपर्यंत लांब असावेत. यानेदेखील शिरांवर एक सुखद दाब तयार होतो. मोजे सुतीच असावेत. पायांतील बुटांची खूप झीज होईपर्यंत वापरू नयेत. झिजलेल्या बुटांमुळे उभी राहण्याची पद्धत चुकीची होते. चालायची ढब(Gait) बदलते आणि याचा परिणाम मणक्यांवर होतो. तसेच हल्ली Traffic offenders ना पकडण्यासाठी व पाहणी करण्यासाठी बरेचदा खूप वेळ दुचाकीवरून फिरावे लागते. दुचाकीवर बसताना सरळ बसावे. पोक काढून बसू नये. खूप वेळ दुचाकी चालवल्याने खांदे दुखणे, जखडणे, खांदे भरून येणे सुरू होते. असे होत असल्यास किंवा हे टाळण्यासाठी नस्य (नाकात औषधी तेलाचे थेंब घालणे) करावे.
 
 
वाहतूक पोलिसांचे काम असे आहे की, त्यांना नैसर्गिक क्रिया (शौच शुद्धी) करण्यासही तात्काळ जाता येत नाही. शौचास व मूत्रविसर्जनाला जाणे रोखून धरावे लागते. तहानभूकही दाबावी लागते. आयुर्वेदाप्रमाणे हे शारीरिक वेग (Urges) रोखून धरल्यामुळे ‘उदावर्त’ हा आजार उत्पन्न होतो. यात पोट फुगणे, भूक मंदावणे, ओटीपोटात दुखणे, लघवी होताना त्रास होणे, डोकेदुखी, शौचास न होणे इ. तक्रारी उद्भवातात. हे टाळण्यासाठी मलमूत्राचे वेग (संवेदना) थांबवू नयेत. आहारात तुपाचा वापर असावा. त्यामुळे शरीरात रूक्षता येत नाही. अन्न नीट पचते आणि थकवा अशक्तपणा उद्भवत नाही. तहान-भूकेची संवेदना रोखून धरल्यास अंगदुखी, थकावा, चक्कर येणे, कण्ठ व तोंड कोरडे पडणे आदी लक्षणे निर्माण होतात. वारंवार असे करावे लागल्यास कृशता, शरीर काळवंडणे, अन्नातील रूची निघून जाणे, छातीत दुखणे, ऐकू कमी येणे इ. लक्षणे उत्पन्न होतात असे आयुर्वेदात सांगितले आहे. हे टाळण्यासाठी सात्विक, पोषक आहार घ्यावा व पाणी, लिंबू सरबत व तत्सम सरबते तहान लागल्यावर प्यावीत. आहाराचा विचार करताना महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा तो म्हणजे एका वेळेस जेवल्यावर चार तास काही खाऊ नये पण, सहा तासांच्या वर पोट उपाशी ठेऊ नये. दोन वेळचे जेवण आणि दोन वेळचा हलका आहार घ्यावा. म्हणजे सकाळी १०च्या भुकेला आणि संध्याकाळच्या ५ च्या भुकेला फलाहार, राजगिरा लाडू, चिवडा इ. खावे आणि इतर दोन वेळेस जेवावे. जेवताना पोटाचे चार भाग योजावेत. Imagine करावेत. त्यातील दोन भाग (अर्धपोट) घन आहाराने (Solid food) भरावे. उरलेल्या दोन भागांपैकी एक भाग द्रवाहार (Liquid food) ने भरावे. म्हणजे आमटी, ताक, पाणी इ. आणि उरलेला एक भाग रिकामा ठेवावा. असे केल्यास पचन नीट होते. अन्न नीट चावून खाल्याने तोंडातूनच लाळेबरोबर पचन सुरू होते. उत्तम पचन झाल्यावर शरीराला जो पोषक अंश मिळतो तो उत्तम स्वरूपाचा असतो. जेवायला १०-1५ मिनिटे पुरेसे होतात. तेव्हा on duty देखील आहार या पद्धतीनेच घ्यावा. असे न केल्यास आम्लपित्त(Acidity) आणि ॠरीशी चा त्रास उद्भवतो आणि कामाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. वाहतूक पोलिसांची गरज तिथे जास्त असते जिथे वाहतूक मोठ्या प्रमाणात ये-जा असते. वाहनांच्या मध्यभागी उभे राहणे म्हणजे वाहनांमधून निघणाऱ्या धुराळ्यात उभे राहणे होय. वाहनांमधून येणारे धूर काही विषारी आहेत, तर काही बिनविषारी. याच बरोबर गाड्यांच्या रबरी टायर्सचा रस्त्याशी संपर्क आल्यावर काही कण उडतात. Carbon Monoxide Nitrogine Dioxide, Benzene Xylene, Colloldal Particles इ. सर्वांचे संमिश्रण होते आणि यात अधिक काळ उभे राहून काम केल्याने श्वसनाचे त्रास, तक्रारी उद्भवतात तसेच ऊन-वारा, पाऊस-थंडी अशा विविध ऋतूंमध्येही खुल्या ठिकाणी काम करावे लागते. त्वचेवर या बाह्य वातावरणाचाही परिणाम होतो. विविध ठिकाणी काम करावे लागते. त्वचेवर या बाह्य वातावरणाचाही परिणाम होतो. विविध कारणांमुळे ताण-तणाव (मानसिक) अधिक निर्माण होतो. या सर्व मुद्यांविषयी पुढील भागात वाचूया... 
 
क्रमश:
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@