अफ्रिनचे युद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018   
Total Views |
 



पिकेके या दहशतवादी संघटनेचे उच्चाटन करण्याच्या सबबीखाली जानेवारी २०१८ मध्ये तुर्कस्तानने रोजावातील अफ्रिनवर हल्ले सुरू केले. ओपरेशन ओलिव्ह ब्रान्च हे या सैनिकी कारवाईचे सांकेतिक नाव. हे हल्ले इतके जोरदार होते की, परिणामी हल्ल्यांपासून संरक्षण करून आपला जीव वाचवण्यासाठी अफ्रिनवासीयांनी पलायन केले. निर्वासित म्हणून ते जवळपासच्या गावात राहू लागले.

 
 

उत्तर सीरियामधील अलेप्पोमधील अफ्रिन हा एक जिल्हा आहे. रोजावा क्रांतीमध्ये हा भाग रोजावामध्ये सामील झाला व त्यावर पीवायडी आणि वायपीजीचे वर्चस्व स्थापन झाले. हा भाग तुर्कस्तानच्या सीमेला लागून आहे. त्यात हा भाग वायपीजी आणि पीवायडी या तुर्कांनी दहशतवादी घोषित केलेल्या संघटनेच्या अधिपत्याखाली येताच तुर्कस्तानचा संताप झाला. त्यांच्या म्हणजे तुर्कस्तानच्या दृष्टीने पीवायडी आणि वायपीजी या ओकलान अब्दुल्लाच्या ‘पिकेके’ च्या दहशतवादी शाखा आहेत. एका अर्थाने त्यांचे म्हणणे बरोबर होते, कारण वायपीजीमध्ये पिकेकेचे शेकडो लढाऊ सैनिक सामील झाले आहेत, असे पीवायडीचा सध्याचा अध्यक्ष सलीह मुस्लीमने मान्य केले आहे. सूत्रांनुसार अफ्रिनमध्ये ८ ते १० हजार कुर्दिश योद्धे आहेत. तुर्कस्तानला त्यांच्या सीमेलगत कुर्दिश कॉरिडोर तयार होईल याची भीती वाटत होती. तुर्की अध्यक्ष एर्दोगनने तर स्पष्टच सांगितले की, “पश्चिमेपासून सुरुवात करून आम्ही टप्प्याटप्प्याने हा कॉरिडोर नष्ट करून टाकू.” त्यामुळे तुर्कस्तानने अफ्रिनवर हल्ले करण्याचा निर्णय घेऊन हवाई व जमिनीवरून हल्ले सुरूदेखील केले. तुर्कीने केवळ पीवायडी आणि वायपीजी आमचे लक्ष्य आहेत, असे सांगून त्यांच्यावरच आम्ही हल्ले करू, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकांनाही या हल्ल्याची झळ पोहोचत होती. अफ्रिनचा हवाई ताबा रशियाकडे होता, तुर्कस्तानच्या या हल्ल्यांवर रशियाने काहीही आक्षेप घेतला नाही, म्हणजे एकतर रशियाला या हल्ल्यांची पूर्वकल्पना होती व पूर्वकल्पना जरी नसली तरी रशियाने आक्षेप न घेतल्यामुळे रशियाची या हल्ल्यांना मूकसंमती होती, असा अर्थ होतो. एकप्रकारे रशियाने अफ्रिनमधून माघार घेऊन तुर्कांसाठी अफ्रिनचा मार्ग मोकळा करून दिलाअमेरिका पिकेकेला दहशतवादी संघटना मानते व पीवायडी ही त्याची सीरियन शाखा आहे, हेही मान्य करते, पण पीवायडीच्या वायपीजीला अमेरिका इसिसविरोधी युद्धात सहायक मानते, त्यामुळे वायपीजीला त्यांनी इसिसविरोधी युद्धात बरीच मदत केली आहे. त्यामुळे वायपीजीला दहशतवादी संघटना मानण्यात अमेरिकेचे तळ्यात-मळ्यात सुरू असते. वायपीजीला इसिसविरोधात साहाय्य करण्यावरून अमेरिका व तुर्कस्तान या नाटो सहकार्‍यांमध्ये तणाव निर्माण झाला होता, हे आपण मागे पाहिलेच आहे. अमेरिकेने इसिसविरोधात लढण्यासाठी रोजावा सेनेला आर्थिक साहाय्य व शस्त्रास्त्र पुरवठा करून बळ दिले तर उद्या हे युद्धसज्ज रोजावाचे कुर्दिश सैनिक अफ्रिन व युफ्रेटस नदी दरम्यानच्या ६० मैलाच्या प्रदेशाकडे सरकतील म्हणजे तो भाग कूर्दबहुल होण्याची भीती तुर्कस्तानला भेडसावत आहे.

 
 

तुर्कांनी अफ्रिनमध्ये युद्ध आरंभिले आहे, इसिस कूर्दांविरुद्ध रोजावामध्ये अयशस्वी ठरली, गाजलेल्या कोबान युद्धामध्ये तर त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे इसिसचे अपुरे राहिलेले काम आता तुर्कांनी पूर्ण करायचा निर्णय घेतलाय की काय अशी शंका येईल इतके जोरदार हवाई हल्ले व रणगाडे, तोफांचा मारा तुर्कांनी सुरू केला. कोबान युद्धाच्या वेळी जसे जग याकडे दुर्लक्ष करून मख्खपणे शांत बसले होते तसेच या तुर्कांच्या चढाईच्यावेळीही सारे जग याकडे दुर्लक्ष करून मख्खपणे शांत बसले होते. मुस्लीम बहुसंख्य असूनही सेक्युलर राष्ट्र असणार्‍या केमाल अतातुर्कच्या तुर्कस्तानने आता हळूहळू आपल्या सेक्युलर भूमिकेपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे, कारण सध्याच्या तुर्कस्तानच्या अध्यक्ष एर्दोगनने इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूडला, गाझामध्ये हमास चळवळीला पाठिंबा दिला आहे. सीरियामध्येही मुस्लीम ब्रदरहूडमधील सीरियन सलाफी शस्त्रधारी गटाला शस्त्र व अर्थपुरवठा करत आहे. खरंतर अफ्रिनमधून तुर्कस्तानवर एकही हल्ला केला गेला नाही, एकही गोळी झाडली गेली नाही. उलट रोजावाच्या अधिपत्याखालील अफ्रिनमध्ये सीरिया राजवट व जिहादी हल्ल्यामुळे पलायन केलेया हजारो सीरियन लोकांसाठी सुरक्षित व शांत आश्रयस्थळ होते. पिकेके या दहशतवादी संघटनेचे उच्चाटन करण्याच्या सबबीखाली जानेवारी २०१८ मध्ये तुर्कस्तानने रोजावातील अफ्रिनवर हल्ले सुरू केले. जशिीरींळेप जश्रर्ळींश इीरपलह हे या सैनिकी कारवाईचे सांकेतिक नाव. हे हल्ले इतके जोरदार होते की, परिणामी हल्ल्यांपासून संरक्षण करून आपला जीव वाचवण्यासाठी अफ्रिनवासीयांनी पलायन केले. निर्वासित म्हणून ते जवळपासच्या गावात राहू लागले. हल्ल्याचा जोर थोडा कमी होताच काही कूर्द आपल्या घरी परतू लागले, पण त्यांना असे आढळून आले की, आपल्या घराचा ताबा अरबांनी घेतला आहे. त्यांच्या जमिनी, शेती, फर्निचर इत्यादी सर्व काही जप्त केले गेले आहे आणि दिवसागणिक अफ्रिनमध्ये अरबांची संख्या वाढत आहे. तुर्कस्तानला आपल्या सीमेजवळ कूर्द बहुसंख्या असलेला प्रदेश नकोय व म्हणून या कूर्दबहुल अफ्रिनची जनसंख्या बदलामागे तुर्कस्तानचा हात आहे, असा संशय आहे. तुर्कस्तानने हे आरोप फेटाळून लावले असून केवळ पिकेकेचे उच्चाटन हेच आमचे ध्येय आहे, याचा पुनरुच्चार केला. पण जानेवारीच्या हल्ल्यानंतर तुर्की अध्यक्ष एर्दोगननेआम्ही अफ्रिनला त्यांचे खरे रास्त मालक परत मिळवून देऊ,” असे सूचक विधान केले होते. संयुक्त राष्ट्रसंघ व मानवाधिकार संघटनांनी पिकेके या दहशतवादी संघटनेचा बिमोड करण्याच्या सबबीखाली सामान्य कुर्दांना लक्ष्य करून कूर्द हत्याकांड तर केले जात नाहीय ना, याची चौकशी करणे आवश्यक आहे. रशिया, इराक, इराण व संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या भूमिकेवरही सर्व काही अवलंबून आहे. कारण बाह्य साहाय्याव्यतिरिक्त कूर्द सैन्य एकटे तुर्कस्तानशी लढा देऊन जिंकणे तसे अवघड वाटत आहे. अमेरिका यात काय भूमिका घेतेय, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे कारण अमेरिकेची भूमिका यात निर्णायक ठरू शकते. इसिसविरोधी कोबान युद्धात संकटसमयी पेशमर्गा सेनेने व अमेरिकेने मदत केली व युद्धाचे पारडे फिरले. इराकी कुर्दिस्तानच्या पेशमर्गा सेनेचे तुर्कस्तानशी तसे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याही भूमिकेला महत्त्व आहे. सध्या अफ्रिनचा ताबा तुर्कस्तानने घेतलेला असला तरी रोजावाचे कूर्द सैनिक गप्प बसणार नाहीत. कुर्दिश सेनेने गनिमी काव्याच्या युद्धनीतीने तुर्कस्तानविरुद्ध प्रतिशोध घेतला जाईल, अशी शपथ घेतली आहे. यात रोजावाचा पराभव होऊन रोजावाचा प्रयोग फसतोय की, तुर्कस्तानचा पराभव होऊन तुर्कस्तानला मोठा धक्का बसेल की मध्यस्थीने तह होईल? याचे उत्तर येणारा काळच देईल की ज्यावर रोजावाचे यशापयश अवलंबून असेल.

 

संदर्भ – 

1. Erdogan: Operation in Syria's Afrin has begun, Al-Jazeera, 21 January 2018

2. Chulov, Martin Shaheen, Kareem. 'Nothing is ours anymore': Kurds forced out of Afrin after Turkish assault, The Guardian, 7 June 2018

 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/  
 
@@AUTHORINFO_V1@@