उस्मानाबादमध्ये उंटांची तस्करी करणारे जेरबंद

    11-Sep-2018
Total Views | 47


 

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील महामार्ग पोलिसांनी उंटांची तस्करी करणारा एक ट्रक पकडला आहे. पोलिसांनी ट्रकसह १४ उंट ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही पोलिसांनी २ ट्रक ताब्यात घेतले होते. या कारवाईमुळे उंटांची तस्करी करण्याऱ्या आंतरराज्यीय टोळीला प्रतिबंध करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून येऊन उंटाची तस्करी केली जाते. उंटांच्या मांस आणि कातडीची तस्करांना मोठी किमंत मिळते. तस्करी करताना उंटाचे पाय बांधून एका ट्रकमध्ये भरले जायचे. आवाजकरू नये म्हणून त्यांचे तोंडही बांधले जायचे. गेल्या दोन दिवसात आतापर्यंत चार उंटांनी जीव गमावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस याबाबतीत अधिक तपास करत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121