श्रीविष्णूंच्या संयुक्त प्रतिमा, मूर्तिविधान आणि चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2018   
Total Views |



 

देवतेच्या लिखित वर्णनावरून शिल्प-मूर्ती-चित्र निर्माण केले जाते, त्याला मूर्तिविधानअसे संबोधन आहे. अशा मूर्तिविधानात काही देवतांच्या प्रतिमा अष्टभुज शरीर मुद्रेत निर्माण झाल्या. अशा आठ हातांचे संकेतसुद्धा फार संपूर्ण आहेत. आरोग्य, ज्ञान, धन, संघटन व्यवस्था, सहकार आणि सहोद्योग, कीर्ती, धैर्य आणि सत्य अशा ज्ञानशाखा आणि गुणवत्तांचे हे आठ संकेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

विष्णू पुराणातीलअस्त्र भूषण’ अध्याय या अध्यायात ‘श्रीविष्णू’ या देवतेच्या संयुक्त प्रतिमेतील चिह्नसंकेतांचा विस्ताराने अभ्यास करता येतो. कौस्तुभ मणी, श्रीवत्स मुद्रा, गदा, शंख, धनुष्य, खड्ग, चक्र, बाण आणि वनमाला अशा प्रतिमेतील प्रत्येक आयुध आणि अलंकाराला स्वतंत्र वैशिष्ट्य आहे आणि देवतेच्या सन्निध या प्रत्येकाची सापेक्षता वेगळी आहेअनंत शेषनागावर आसनस्थ झालेल्या श्रीविष्णू यांचे वास्तव्य क्षीरसागरात आहे, असे आपल्याला वाचून माहीत असते. हा क्षीरसागर हे विश्वनिर्मितीच्या आधीच्या प्रकृतीचे प्रतीक आहे आणि ही प्रकृती स्त्रीसमान मानली गेली आहे. या प्रतिमेतील हा ‘सांकेतिक क्षीरसागर’ म्हणजेच दुधाचा समुद्र. यातील प्रकृतीच्या अर्थात निसर्गाच्या आणि मानवाच्या तीन प्राथमिक गुणधर्मांचे म्हणजेच राजस-तामस-सत्व अशा तीन गुणवत्तांचे हे चिह्नसंकेत फार विलक्षण आहेत. प्रकृतीचा राजस गुण म्हणजे विस्तार आणि वृद्धी. तामस गुण म्हणजे आकुंचन आणि लय-नाश, तर प्रकृतीचा सत्व गुण म्हणजे समरसता आणि शांतता. सजीव मानव याच प्रकृतीचा अविभक्त हिस्सा आहे आणि हेच तीन गुण मानवाच्या व्यक्तिमत्वाचे अविभाज्य वैशिष्ट्य आहेत. मात्र, प्रकृतीच्या या तीन गुणांचे संतुलन बिघडले की ते राखण्यासाठी श्रीविष्णू, पृथ्वी-पाणी-वायू-अग्नी-आकाश या पाच महाभूतांना मंथनासाठी पुन्हा आवाहन करतात, असा हा सांकेतिक क्षीरसागर. दुधातून मंथन करून जसे लोणी निघते, तसे मानवाच्या मनाचे मंथन करून त्यातून स्थितीतत्वाचे स्वामी श्रीविष्णू संतुलन निर्माण करतात, ज्यायोगे मानवाचे जीवन सुखकर होते.

 

प्राचीन भारतीय चिह्नसंकेतानुसार मानवाच्या शरीरात पाच उपशरीरे मानली गेली आहेत. अन्नमयकोष म्हणजे प्रत्यक्ष हाडामासाचे शरीर, प्राणमयकोष म्हणजे श्वास-उच्छवास नियंत्रणाची अव्याहत क्रिया. मनोमयकोष म्हणजे स्वप्रेरणेने होणारे मनोव्यापार, तर विज्ञानमयकोष म्हणजे स्वप्रेरणेने होणारे बुद्धीचे व्यापार. पाचवे शरीर आनंदमयकोष म्हणजेच सर्वोच्च शक्तीच्या प्रेरणेने प्राप्त होणारी परमोच्च सुखाची संकल्पना. स्थितीतत्वाचा स्वामी श्रीविष्णू याची दृश्य प्रतिमा आणि त्यातील चिह्नसंकेत पाठ्यपुस्तकाप्रमाणे आपल्याला सतत आपलाच परिचय करून देत असतात. आधी उल्लेख केल्यानुसार प्राचीन भारतीय प्रतिमाशास्त्र आणि मूर्तिशास्त्राने मानवी शरीर, मन, बुद्धी आणि चेतना याचा अभ्यास प्रत्येक व्यक्तीच्या आणि समाजाच्या प्रगती आणि उत्तम आरोग्यासाठी विस्ताराने आपल्यासाठी चिरंतन स्वरूपात अक्षर केला आहे. सामान्यत: श्रीविष्णू शेषनागावर आसनस्थ झाले आहेत अशी संयुक्त प्रतिमा आपल्याला नेहमी पाहायला मिळते. हजार फणा असलेला हा जहरी शेषनाग सजीवांच्या अगणित शारीरिक-मानसिक-भावनिक वासनांचे प्रतीक आहे. जहरी सर्पाने एक दंश केला तरी सजीवाचा मृत्यू होतो, तशीच यातील एक वासनासुद्धा सजीवांच्या विनाशाला कारणीभूत होते. जहरी शेषनागाच्या दोन वेढ्यांवर आसनस्थ झालेले, स्थिती तत्त्वाचे कर्ते श्रीविष्णू, सजीवांच्या अशा अगणित विवेकहीन वासनांवर नियंत्रण ठेवतात, असा हा चिह्नसंकेत आहे.

 

भारतीय मूर्तिकलेतील चिह्नसंकेतांमध्ये देव-देवतांच्या अनेक हाताना फार महत्त्व आहे. "The Dance of Shiva' या 1918 सालात प्रकाशित झालेल्या निबंधसंग्रहात आनंद कुमारस्वामी यांनी या विषयाची विस्ताराने समीक्षा केली आहेदेवतेच्या चार हातांचा संदर्भ खूपच वेगळे संकेत देतोहे संकेत प्रत्येक देवतेच्या व्यष्टीवर अवलंबून आहेत असे लक्षात येते. चार दिशा, चार यज्ञकुंड, चार वेद, चार वर्ण, चार आश्रम, चार चेतनाचार अभिव्यक्ती, चार धर्म, चार पुरुषार्थ, चार मुक्ती, चार युगचार जन्म, चार योगचार भेद असे चतुर्भुज देवतेचे इतके चिह्नसंकेत आपल्याला अचंबित करतातदेवतेच्या लिखित वर्णनावरून शिल्प-मूर्ती-चित्र निर्माण केले जाते, त्याला मूर्तिविधान’ असे संबोधन आहेअशा मूर्तिविधानात काही देवतांच्या प्रतिमा अष्टभुज शरीर मुद्रेत निर्माण झाल्याअशा आठ हातांचे संकेतसुद्धा फार संपूर्ण आहेत. आरोग्य, ज्ञान, धन, संघटन व्यवस्थासहकार आणि सहोद्योग, कीर्तीधैर्य आणि सत्य अशा ज्ञानशाखा आणि गुणवत्तांचे हे आठ संकेतदर्शकाने उपासना आणि ध्यानधारणेने लक्ष केंद्रित करून प्राप्त करून घेण्यासाठीची ज्ञानसंपदा.

 

 

 

श्रीविष्णू यांच्या प्रतिमेत त्यांच्या शरीराचा रंग नेहमीच निळा अथवा काळा असतो. अवकाशाचा निळा रंग अगणित- अमर्याद विश्वाचे प्रतीक आहे. देवतेचे विश्वातील सर्वव्यापी अस्तित्व याचेच हे प्रतीक आहे. काळा रंग हा सर्व रंगांचे एकत्रित समावेशक प्रतीक आहे. विश्वातील अणु-रेणूंमध्ये असलेले देवतेचे अस्तित्व या काळ्या रंगाच्या निर्देशातून व्यक्त होते. ब्रह्मपुराणातील उल्लेखानुसार श्रीविष्णूंनी त्यांच्या प्रत्येक अवतारात, त्या त्या काळाच्या गुणविशेषानुसार अन्य शरीर वर्ण धारण केले आहेत. श्रीकृष्ण अवतारातील काही प्रतिमांमध्ये श्रीविष्णूंच्या हातात ‘खड्ग’ म्हणजे म्यानात ठेवलेली तलवार आहे. तलवारीची म्यान म्हणजे अभ्यासाने योग्य ज्ञान प्राप्त करून न घेतल्यामुळे, जन्मजात अज्ञानाने झाकलेली मानवाची बुद्धी आणि जाणीव याचे प्रतीक आहे. हे अज्ञान फक्त लिहिण्या-वाचण्याने दूर होत नाही. कारण जाणिवांचे अज्ञान म्हणजे मानवी जन्म प्राप्त होऊनही स्वतःला जे ओळखू शकत नाहीत, अशा समाजातील व्यक्तींचा संकेत. ‘नंदक’ या संबोधनाने परिचित असलेली त्याची तेजस्वी तलवार म्हणजे त्याच्या संपूर्ण ज्ञानाचे प्रतीक आहे. हीच तलवार मानवी बुद्धीवरचे अज्ञानाचे पटल दूर करते असा हा चिरंतन चिह्नसंकेत. महादेवाच्या ‘खंडोबा’ या विग्रह प्रतिमेतील त्याच्या हातातील खंड म्हणजेच त्याची भारी-भक्कम तेजस्वी तलवार अशीच त्याच्या अलौकिक ज्ञानाचे प्रतीक आहे.

 

श्रीविष्णूंच्या श्रीराम अवतारातील प्रतिमेत त्यांच्या हातात धनुष्य आहे आणि भात्यात बाण आहेत. धनुष्य-बाण या चिह्नाचे संकेत असेच मानवी मनोव्यापाराशी जोडलेले आहेत. आनंद कुमारस्वामी या चिह्नसंस्कृतीच्या ज्येष्ठ आणि जगन्मान्य विद्वान अभ्यासकाने जगभरातील धनुर्विद्येचा आणि त्यातील चिह्नसंकेतांचा सखोल अभ्यास मांडणारा दीर्घ निबंध ‘Studies of comparative religion' या 1971 सालात प्रकाशित झालेल्या निबंध संग्रहाच्या पाचव्या खंडाच्या दुसर्‍या भागात समाविष्ट केला गेला आहे. शतकापूर्वी लिहिलेल्या या निबंधात, श्रीरामाच्या प्रतिमेतील धनुष्य-बाण या चिह्नासंदर्भात त्यांची फार सखोल टिप्पणी आपल्याला वाचता येते. या बरोबरच कथा उपनिषदमैत्री उपनिषद आणि विष्णुपुराणात या धनुष्य-बाण चिह्नाचे विश्लेषण विस्ताराने केले आहे. हे धनुष्यवास्तव जगातील आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचे म्हणजेच तामस अहंकाराचे प्रतीक आहे. डोळे-कान-जिव्हा-नाक-त्वचा ही आपल्या प्रत्येकाची नैसर्गिक संवेदना इंद्रिये, त्यांची चेतना आणि त्यामार्फत नियंत्रित होणार्‍या भावना आणि त्यांचे कार्य हे सर्व आपल्या वास्तव जगातील अस्तित्वाचे दर्शक आहेत. यालाच अहंकारअसे संबोधले आहे. या इंद्रियांची भावना धारण करून ती बाहेरच्या वास्तव जगात प्रत्यक्ष पोहोचवण्याचे काम हेच या बाणाचे प्रतिकमूल्य आहे. ‘कथा उपनिषदआणि मैत्री उपनिषद’ या दोन संहितामध्ये या धनुर्विद्येचे फार विलक्षण वर्णन केले आहे आणि प्रत्येक धनुर्धारीला ‘तन्मयो भवेतअसा आशीर्वाद दिला आहे. इंद्रिय भावनांच्या साहय्याने आपल्या शरीरातील शुद्ध चैतन्यशक्तीचे धनुष्य बनवाआपल्या सूक्ष्म मनाचे अग्र असलेला ध्येयधारणेचा बाण बनवा आणि तुमचे लक्ष्य आहे तो उत्सुक अंध:कार ज्याच्या पलीकडे आहे. तुमच्या निर्मितीसाठी आवश्यक अविनाशी ब्रह्मचैतन्य... त्या लक्ष्याच्या दिशेने तन्मयो भवेत एकरूप व्हा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@