वांद्रे टर्मिनसला शिवसेना प्रमुखांचे नाव द्या

    31-Aug-2018
Total Views | 28


 


खा. पूनम महाजन यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी


मुंबई : वांद्रे टर्मिनसला शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी उत्तर-मध्य मुंबईच्या खा. पूनम महाजन यांनी केली आहे. मतदारसंघातील भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती, यावेळी त्यांनी ही मागणी केली. या मागणीवर रेल्वेमंत्र्यांनी लवकरात-लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून राज्य सरकारनेही याचा प्रस्ताव त्वरित रेल्वेखात्यास पाठवण्याचे मान्य केले आहे.

 
 
 

मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या खा. महाजन यांनी मतदारसंघातून धावणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्ग, मध्य रेल्वे मार्ग व हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाश्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये बांद्रा टर्मिनस, खार, बांद्रा, सांताक्रूज, विलेपार्ले, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, टिळकनगर व चुनाभट्टी या स्थानकांचा समावेश आहे.

 
 
 

कुर्ला स्थानकाच्या पूर्वेच्या बाजूपासून भाभा हॉस्पिटलपर्यंत फूट ओव्हर ब्रिज, विद्याविहार ते लोकमान्य टिळक टर्मिनस फूट ओव्हर ब्रिज, विविध स्थानकांवरील शौचालये, क्रांतीनगर, साबळेनगर तसेच तीन बंगला येथील रेल्वेखात्याच्या अखत्यारीतील जमिनीवर राहणाऱ्या रहिवाशांच्या निवासाचा प्रश्न, बांद्रा टर्मिनस ते खार रेल्वे स्थानक फूट ओव्हर ब्रिज, सरकते जिने इत्यादी प्रश्नासंदर्भात खा. महाजन यांनी त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121