हवा के साथ साथ...

Total Views | 24


 
 

२०२० पर्यंत ‘उबेर’ने जगातील काही मुख्य शहरांत ही हवाई टॅक्सीची सेवा सुरू करण्याचे ठरविले असून यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प लॉस एंजेलिस आणि दलास या शहरांमध्ये सुरू करण्यात येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

१९६० च्या दशकात अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीने जेट सननावाचे कार्टून प्रसारित केले. नंतर ते भारतासह जगभरातही तितकेच गाजले. त्या कार्टुनमध्ये जॉर्ज जेटसन यांचे कुटुंब २०५० च्या तंत्रज्ञानाच्या वेगावर कसे स्वार आहे, याचे उत्तम कल्पनाचित्र साकारण्यात आले होते. त्यांच्या गाड्या रस्त्यावर नाही, तर चक्क अवकाशात उडायच्या. लहानपणी ज्यांनी हे कार्टून पाहिले असेल, त्यांच्यासाठी ही भविष्यातली नगरी खरचं अचंबित करणारी होती. पण, हीच नगरी जर येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात पाहायला मिळाली, तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. काही दिवसांपूर्वीउबेरया अमेरिकन कंपनीने आपला ड्रीम प्रोजेक्ट असलेलाफ्लाईंग टॅक्सीचा प्रकल्प मार्गी लावला आहे आणि आगामी पाच वर्षांत आपल्याला शहरीकरणाची अशी आधुनिक, तंत्रकुशल चित्रं दिसायला लागली, तर नवल वाटायला नकोच. २०२० पर्यंतउबेरने जगातील काही मुख्य शहरांत ही हवाई टॅक्सीची सेवा सुरू करण्याचे ठरविले असून यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प लॉस एंजेलिस आणि दलास या शहरांमध्ये सुरू करण्यात येईल, अशी घोषणाही केली. मात्र, ही सेवा जगभरातल्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये सुरू करण्याचेउबेरने योजिले आणि त्यासाठी काही देशांची निवडही करण्यात आली. ज्या पाच देशांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, त्यात भारताचाही समावेश करण्यात आला. भारताबरोबरच या यादीत जपान, फ्रान्स, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांनाही स्थान देण्यात आले. ही इलेक्ट्रिक टॅक्सी ३०० किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकेल आणि हजार ते दोन हजार फुटांवर उडणाऱ्या या टॅक्सीचा हॅलिकॉप्टरपेक्षाही कमी आवाज होईल आणि यासाठी लागणारे इंधनही पऱ्या वरणपूरक असेल. या सगळ्यातउबेरपुढे मोठे आव्हान होते, ते हवाई वाहतुक कायद्याचे. कारण, रस्त्यांवरील वाहतुकीच्या नियमांपेक्षा हवाई वाहतुकीचे हे नियम जास्त कडक असतात. मात्र, ‘उबेरने या प्रकल्पासाठीनासासोबतही यशस्वी करार केला आणि एअरवेजचा आपला मार्ग मोकळा केला. या प्रकल्पासाठी हवाई टॅक्सी संदर्भातील संशोधन, प्रगती आणि चाचणीसंदर्भातील आव्हानांवर सध्या काम सुरू आहे.
 

आता उडणारी टॅक्सी असल्याने याचा दरही जास्त असेल, असे आपल्याला वाटणं अगदी साहजिकच. पण, हा दर सामान्य टॅक्सीइतकाच ठेवण्याचा प्रयत्नउबेरकरणार आहे, जेणेकरून या प्रकल्पाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जाईल. यापूर्वी अमेरिकेतीलएअर बसया कंपनीने फ्लाईंग कारची संकल्पना मांडली होती, त्यावर कामही सुरू आहे, त्यामुळे येत्या काही वर्षात जेटसनचं अवकाश कक्षातलं शहर खरंच तयार होईल, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. जपानमधील सार्वजनिक वाहतूक, त्यांचं प्रगतशील तंत्रज्ञान यामुळे जपानची निवड या यादीत करण्यात आली, तर भारत हा जगातील सर्वांत जास्त दाटीवाटीचा देश असल्यामुळे इथे या सेवेची सर्वाधिक गरज असल्याचंउबेरला वाटतं. ऑस्ट्रेलियात या आधीच अशाप्रकारे शहरी हवाई वाहतूक सुरू करण्याच्या मार्गावर आहे. फ्रान्स आणि ब्राझील या दोन्ही देशांत हेलिकॉप्टरचा वापर वाहतुकीसाठी जास्त केला जातो. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत या सेवेसाठी भारत किती पूरक आहे, यासाठीउबेरएक सर्वेक्षण करेल आणि मग ठरवेल की, भारतात ही सेवा योग्य आहे अथवा नाही. याबाबतउबेरकडून भारताचे नागरी उड्डाणमंत्री जयंत सिन्हा यांच्याशी सविस्तर चर्चाही करण्यात आली. आता यात मुळात प्रश्न आहे तो, भारतातीलएअरवेजचा. भारतात ही सेवा दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी जर सुरू करण्यात आली तर, या दोन्ही राज्यांतून दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय वाहतूक होत असते. त्यामुळे येत्या काळात रस्त्यांबरोबरच एअर ट्रॅफिकही वाढणार, एवढं मात्र नक्की!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

प्रियांका गावडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. वाचनाची आवड व क्रीडा विषयामध्ये विशेष रस. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण.

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121