अंबरनाथ येथे वडापावमध्ये आढळली मृत पाल

    23-Aug-2018
Total Views | 56



अंबरनाथ : भल्या पहाटेपासून रेल्वे स्थानक परिसरात सज्ज असलेल्या एका वडापाव दुकानातील वडापावमध्ये मृत पालीचे पिल्लू आढळून आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या रेल्वे स्थानक परिसरात घडल्याने अंबरनाथवासियांचे धाबे दणाणले आहेत.

 

अंबरनाथच्या रेल्वे स्थानक परिसरात शिवाजी चौकात ‘बबन बेस्ट मसाला वडापाव’ दुकानातून त्याच परिसरातील अल्पा गोहिल हिने तिच्या कार्यालयातील सहकार्यासाठी तीन वडापाव आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेले होते, यापैकी एका वडापावमध्ये मरण पावलेले पालीचे पिल्लू आढळून आल्याने तिने वडापाव परत आणून दिला आणि त्यात पाल असल्याचे सांगितले. यावेळी तिथे काम करणाऱ्याने उद्धट वर्तन केल्याची तक्रार गोहिल हिने केली आणि वडापावाचे पैसे परत घेतले.

 

वडापावमध्ये मृत पाल सापडल्याचे वृत्त अंबरनाथमध्ये सर्वत्र समजताच वडापाव केंद्रावर नागरिकांची एकच गर्दी झाली. या गडबडीत शिवाजी चौकातील खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या गायब झाल्याने शिवाजी चौक परिसरात शुकशुकाट पसरला होता. याप्रकरणी वडापाव कर्मचाऱ्याकडून चूक झाली असेल, असे या वडापावच्या दुकानाचे मालक बबन पटेल यांनी सांगितले.

 

शिवाजी चौकात वडापाव आणि इतर खाद्य पदार्थ्यांच्या विक्रीचा अनधिकृत व्यवसाय वाढत आहेत, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल तसेच शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटीसा बजावणार असल्याचे पालिका आरोग्य सभापती शशांक गायकवाड यांनी सांगितले. बबन वडापाव दुकानातील वडापावाचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्याधिकारी सुरेश पाटील यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून वडापाव विक्रेत्याला ताब्यात घेतल्याचे शिवाजीनगर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121