नवी दिल्ली : केंद्रीय वित्त व अर्थमंत्रालयाचा कार्यभार अरुण जेटली यांनी पुन्हा एकदा स्वीकारला आहे. अरुण जेटली यांच्या किडनीवर शस्त्रक्रिया झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आराम मिळावा म्हणून गेले ३ महिने ते अर्थमंत्रालयाच्या कामकाजापासून दूर होते. दरम्यान, हा कार्यभार रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता अरुण जेटलींकडे पुन्हा एकदा देशाच्या अर्थ व कॉर्पोरेट मंत्रालयाची जबाबदारी आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/