बँका, शाळांना मिळाली अनपेक्षित सुटी

    02-Aug-2018
Total Views | 20

आर्थिक व्यवहारांना चाप लावण्यासाठी दक्षता

जळगाव :
मतदान केंद्र असलेल्या शाळा व महाविद्यालयांना मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्तांनी ३१ जुलै व १ ऑगस्टला सुटी जाहीर केली होती. परंतु अनपेक्षितपणे सर्वच शाळा आणि बँकांना यात सामावून घेत १ ऑगस्टला त्यांनाही पूर्ण दिवस सुटी देण्यात आली.
 
 
मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी बजावलेल्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सायंकाळी अनपेक्षितपणे सर्वच शाळांना १ ऑगस्टची पूर्ण दिवस सुटी जाहीर करण्यात आली. तातडीने तसे निरोप विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही एकाअर्थी सुटीची लॉटरी लागली.
 
 
मतदान संपण्याची आणि दुपारच्या सत्रातील शाळा सुटण्याची वेळ एकच येत असल्याने गर्दी टाळण्यासाठी, तसेच निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात तणाव निर्माण करणार्‍या घटना गेल्या पाच ते सहा दिवसात घडल्या असल्याने खबरदारी म्हणून शाळांना सुटी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक देवघेव होण्यास प्रोत्साहन मिळू नये, त्याला चाप बसावा या हेतूने सर्वच बँका बंद ठेवण्याचे प्रशासनाने आदेश दिले असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये होती.
 
 
प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून त्यांना भरपगारी सुटी किंवा शक्य नसल्यास दोन तासांची सवलत देण्याचे आदेश संबंधित आस्थापना, दुकाने, उद्योग व व्यावसायिकांना प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु, बुधवारी सकाळच्या सत्रात शहरातील बहुतेक सर्वच प्रमुख मार्केट बंद होते. मतदानामुळे दवाखाने, दाढी-कटिंगचे सलून येथे नेहमीची गर्दीही दिसून आली नाही.
अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..