मुलांसाठी तो आई झाला!

    15-Aug-2018
Total Views |




 


थायलंड : मुलांचे पालनपोषण कसे करावे, यासाठी नेहमीच आईचे दाखले दिले जातात. पण वडीलांना मात्र याबाबतीत कमी महत्व दिले जाते. पण थायलंडमधील एका वडिलांनी आपल्या मुलांसाठी ड्रेस घातला आहे. चाटचाई पनुथाई असे या वडिलांचे नाव असून ते त्यांच्या मुलांसाठी आई झाले आहेत. चाटचाई पनुथाईंना इनसोम आणि ओझोन हे दोन मुलगे आहेत.

 

थायलंडमध्ये १२ ऑगस्ट रोजी मातृदिन साजरा केला जातो. चाटचाई पनुथाईंच्या मुलांच्या शाळेत मातृदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला शाळेतील मुलांच्या आईने येणे शाळेला अपेक्षित होते. परंतु आम्हाला आई का नाही? असा सवाल मुलांनी विचारू नये. त्यांना आईची कमतरता भासू नये. तसेच त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून चाटचाई पनुथाई ड्रेस घालून शाळेतील कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमात त्यांना पाहून एकच हशा पिकला. सर्वजणांनी चाटचाई पनुथाईंचे फोटो व व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. फोटो या कार्यक्रमातील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फेसबुकवर हा व्हिडिओ तब्बल ६ लाख वेळा पाहिला गेला आहे. चाटचाई पनुथाई यांच्यावर त्यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121